Baby
Baby Saam Tv

Mumbai News: पालकांनो सावधान! मुंबईत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, डॉक्टरसह १० जणांना अटक

Mumbai Crime News: फर्टिलिटी सेंटरमध्ये (Fertility Centre) काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने हे रॅकेट चालवले जात होते. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी २ बालकांना रेस्क्यू केले आहे. याप्रकरणी डॉक्टरसह १० जणांना अटक करण्यात आली आहे.

सचिन गाड, मुंबई

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून आतापर्यंत १४ बालकांची विक्री केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला दलालांसह १० आरोपींना अटक केली आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एका डॉक्टराला देखील अटक केली आहे. फर्टिलिटी सेंटरमध्ये (Fertility Centre) काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने हे रॅकेट चालवले जात होते. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी २ बालकांना रेस्क्यू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालकांची विक्री करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने परदाफाश केला आहे. आतापर्यंत या टोळीने १४ बालकांची विक्री केल्याचे उघड झाले असून यातील दोन बालकांना पोलिसांनी रेस्कू देखील केलं आहे. तर उर्वरित १२ बालकांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी एका डॉक्टरसह एकूण १० आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये सर्वात जास्त महिला आहेत.

Baby
Kalyan News: बहिणीचा ड्रायव्हरसोबत प्रेमविवाह; भाऊ संतापला, रागाच्या भरात केलं भयानक कांड

पोलिसांचा दावा आहे की, जवळजवळ सगळ्याच महिला आरोपी या एग डोनर असून त्याच बालकांची खरेदी-विक्री करण्यास इच्छुक असणाऱ्या पालकांना हेरत असतात. ८० हजार ते चार लाखांपर्यंत बालकांची विक्री केली जात असून बालकांच्या मूळ पालकांसह प्रत्येक दलालाची हिस्सेदारी ठरलेली असे. मुंबई तसेच महाराष्ट्रातून खरेदी करण्यात आलेल्या बालकांची विक्री ही तेलंगणा, आंध्र प्रदेश यासारख्या राज्यात देखील होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Baby
Mumbai University Exams: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवीन वेळापत्रक

२०२२ साली विक्रोळीतील एका ५ महिन्यांच्या बाळाची शीतल वारे नावाच्या महिला आरोपीने डॉक्टर संजय खंदारे यांच्या मदतीने दोन लाख रुपयांमध्ये बाळाची विक्री केल्याची गुन्हे शाखा कक्ष २ ला माहिती मिळाली होती. पोलिसांनी बालकाचा शोध घेत रत्नागिरीच्या गुहागरमधून त्याची सुटका केली. तर याच शितल वारेने दलाल शरद देवर आणि स्नेहा सूर्यवंशी यांच्या मदतीने दोन वर्षांच्या मुलीची अडीच लाख रुपयांमध्ये विक्री केल्याचे देखील तपासात निष्पन्न झालं. या मुलीला पोलिसांनी मालाड येथून तिची सुटका केली. सध्या या दोघांनाही महालक्ष्मी येथील बाल आशा ट्रस्टमध्ये ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित १२ बालकांना शोधण्याचे मुंबई पोलिस प्रयत्न करत आहे.

Baby
Pune News: आईच्या कुशीत झोपलेलं ७ महिन्यांचं बाळ अज्ञाताने चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com