Sharad Pawar : राज्यातील नव्या मंत्रिमंडळावर शरद पवार म्हणाले...

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.
NCP Latest News, Sharad Pawar, Maharashtra MantriMandal Vistar 2022, BJP, Nitishkumar,
NCP Latest News, Sharad Pawar, Maharashtra MantriMandal Vistar 2022, BJP, Nitishkumar, Saam TV

Sharad Pawar : ज्या वेळेस मी काॅंग्रेस पक्षातून बाहेर पडलाे त्यानंतर मी पक्षाच्या चिन्हावर हक्क दाखविला नाही अथवा त्यांचे चिन्ह घेतले नाही. वेगळा पक्ष काढला आणि वेगळ चिन्ह घेतलं. त्यामुळं धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही अशी टिप्पणी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर केली. दरम्यान राज्यात झालेल्या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर (maharashtra mantrimandal vistar 2022) पवार यांनी मी त्यावर बाेलणार नाही, राज्यातील नेते बाेलतील असेही स्पष्ट केले.

NCP Latest News, Sharad Pawar, Maharashtra MantriMandal Vistar 2022, BJP, Nitishkumar,
Raksha Bandhan : रक्षाबंधनापुर्वी बहिणीची आत्महत्या; अत्याचार प्रकरणी चुलत भावास अटक

वादविवाद वाढवणे योग्य नाही

ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला वेगळं चिन्ह घेतलं. त्यांचं चिन्ह आम्ही मागितलं नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही असेही पवार यांनी नमूद केले.

NCP Latest News, Sharad Pawar, Maharashtra MantriMandal Vistar 2022, BJP, Nitishkumar,
Serena Williams : टेनिस सुपरस्टार सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घाेषणा; युएस ओपन जिंकण्यासाठी आतूर

आपण सावध राहण्याची गरज

दरम्यान महागाईबाबत पवार म्हणाले श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचे केंद्रीकरण झालं. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातली नाही. काही वर्षातली आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्धभवली आहे ती पाकिस्तानमध्ये देखील उदभवू शकते. आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे असेही पवार यांनी नमूद केले.

विशेषत मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेण्याची गरज आहे. सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे असेही पवार यांनी नमूद केले.

NCP Latest News, Sharad Pawar, Maharashtra MantriMandal Vistar 2022, BJP, Nitishkumar,
Bhandara : वैनगंगा नदीत आढळला खराडीतील युवतीचा मृतदेह

नितीशकुमार वेळीच सावध झाले

पवार यांनी बिहारच्या परिस्थितीवर तसेच भाजपचे नेते सुशील माेदी यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. ते म्हणाले भाजपच्या अध्यक्षांनी अस वक्तव्य केल की प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाहीत. आणि आमचा एकच भाजप हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहिल.नितीश कुमारांची तक्रार आहे तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे. भाजप त्यांच्या सोबत असलेल्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतात.

मित्र पक्षाचा सेनेचा आघात

सेना भाजप एकत्र होते. सेनेत दुही कशी करता येईल अशी परिस्थिती निर्माण केली. सेनेच्या मित्र पक्षाने सेनेवर आघात केला. नितीशकुमार हे लोकांच्यात मान्यता असलेला नेताच आहे. निवडणुकीत भाजप एकत्र येतात आणि मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घेतात. नितीशकुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात करतात. परंतु नितीशकुमारांनी टाकलेल पाऊल शहाणपणाचे आहे असं पवार यांनी नमूद केले.

NCP Latest News, Sharad Pawar, Maharashtra MantriMandal Vistar 2022, BJP, Nitishkumar,
Sharad Pawar : पंजाब, हरियाणा, दक्षिणेत शेतकरी आत्महत्या होत नाहीत, मग आपल्याकडे का होतात ? शरद पवार म्हणाले...

हर घर तिरंगा उपक्रमास साथ

दरम्यान संसद चालवण्याची आस्था केंद्र सरकारमध्ये आहे असं वाटतं नाही. गेल्या काही वर्षापासून हा अनुभव येत आहे. चर्चेचा मार्गच बंद केला जाताे असे पवार यांनी म्हटलं. हर घर तिरंगा हा पक्षीय कार्यक्रम नाही. यात आम्हा सगळयांची त्यांना साथ आहे असेही पवार यांनी नमूद केले.

मी या विषयावर बाेलणार नाही

महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळात महिलांना संधी दिली गेलेली नाही. तसेच संजय राठाेड यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे असे पवार यांना विचारताच त्यांनी मी या विषयावर बाेलणार नाही. राज्यातील नेते अजित पवार, जयंत पाटील आदी हे बाेलतील असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com