Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (28 April 2024): देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...
28 April 2024 Latest Updates on Salman Khan, BJP, Nashik, Sangli, Elections, PM Narendra Modi and overall Maharashtra
28 April 2024 Latest Updates on Salman Khan, BJP, Nashik, Sangli, Elections, PM Narendra Modi and overall MaharashtraSaam TV

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा;  जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

कल्याण पूर्व येथील हनुमान नगर परिसरात एका भटका कुत्र्याने 14 जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे . नियोजन जर आपण आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली . धक्कादायक म्हणजे या जखमींमध्ये आठ लहान मुलांचा समावेश आहे . जखमींना कल्याण मधील रुक्मिणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय .या घटनेनंतर केडीएमसीने या परिसरातील भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे .

आदित्य ठाकरेंचा 30 एप्रिलला श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

आदित्य ठाकरे यांचा 30 एप्रिलला श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

30 एप्रिल रोजी ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे

यावेळी ठाकरे गटाकडून रोड शोचं आयोजन केलं असून आदित्य ठाकरे या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत

सकाळी 10 वाजता रोड शो केला जाणार असून सकाळी 11.30 उमेदवारी अर्ज भरला जाईल

यानंतर हेलिकॉप्टरने आदित्य ठाकरे ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दीना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत

दुपारी 12.30 वाजता विक्रोळी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या

दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. संबंधित विवाहितेच्या नातेवाइकांनी घटनेस जबाबदार पती, सासू, दिर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.

भिवंडी तालुक्यातील प्लास्टीक कंपनी ला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावचे हद्दीत भीषण आग

राजलक्ष्मी हायटेक या इंडस्ट्रियल पार्क मधील प्लास्टिक कंपनी ला भीषण आग

आगीत कंपनी जळून खाक

आगीचे कारण अस्पष्ट

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमनदालाच्या दोन गाड्या दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांच्या शर्थीचे प्रयत्न सुरू

काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आणि धनुष्यबाण सोडवण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे

ही निवडणूक धैर्यशील माने ,हातकणंगले मतदार संघाची नसून ही निवडणूक देशाची आहे..

तुमच्या मनातील सरकार स्थापन केले, काँग्रेसला दावणीला बांधलेली शिवसेना आणि धनुष्यबाण सोडवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे...

मी साधा शांत संयमी माणूस आहे,

कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेली

शिवसेना सोडवत बाळासाहेब ठाकरेचे शिवधनुष्य वाचवण्याचे कांम मी केले

माझ्यातला बाळासाहेब , धर्मवीराचा शिवसैनिक जेव्हा जागा होतो तेव्हा मी टांगा पलटी करतो

अहवाल प्रसिद्ध करण्याची हिंमत काम करणारा खासदारच करू शकतो

मी देखील डोंगराळ भागात जन्म झाला, माझी आणि तुमची नाळ जुळली आहे

मला डोंगरी भागातील समस्याची चांगली जाण आहे

जाहीर सभेत आमदार शहाजी बापू पाटलांची मतदारांना दमबाजी

लोकसभा निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना लीड नाही दिले तर उजनीच पाणी चार ते पाच वर्षे लांबवले जाईल, अशी दमबाजीच शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज रणजीत निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली या सभेमध्ये बोलताना शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उजनीच्या पाण्यावरून उपस्थित शेतकरी व मतदारांना एक प्रकारे दमबाजी केल्याचे समोर आले.

एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात ठाण मांडलं तरी जनता महाविकास आघाडीसोबत; आदित्य ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कितीही ठाण मांडलं तरी हा जिल्हा महाविकास आघाडी सोबत राहणार

महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे आहे देशात इंडिया आघाडी पुढे आहे.

भाजप जिंकणार नाही मात्र चुकून जिंकली तर पहिलं टार्गेट त्याचं संविधान आहे.

भाजपाला संविधान बदलायचा आहे

भाजपला लोकशाही संपवून टाकायची आहे

ते आम्ही होऊ देणार नाही

महाराजांच्या विरोधात इथं प्रचार करणं हा भाजपाचा महाराष्ट्र द्वेष देशासमोर आला आहे

कुंकू लावायचं असेल तर एकाच लावा, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायचं नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडे जातात. बिनविरोध मी पदे दिली आणि प्रचार मात्र त्यांचा करत आहेत. कुंकू लावायचा असेल तर एकाचेच लावा. माझे तरी लावा नाहीतर त्यांचे तरी लावा हा काय चाटाळपणा लावलाय. हे झाकून राहत नाही मला कळते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा मला कळले होते पण जुने पुराने उकळून काढायचे नाही असे मी ठरवले आहे

पुण्यातील रेस कोर्स मैदानावर उद्या नरेंद्र मोदींची सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पुण्यात सभा होतेय त्यानिमित्त प्रशासनाकडून तयारी जवळपास पूर्ण झालीय. उद्या संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येतील आणि पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जनतेला संबोधित करतील. याच निमित्ताने सभास्थळी मोठ्या प्रमाणावर स्क्रीन, भव्य मंच, विद्युत रोषणाई उभारली आहे. पुण्यातील रेस कोर्स मैदानात होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी..

उत्तर पश्चिम मुंबईतून रविंद्र वायकरांचं नाव निश्चित?

देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे; निलेश लंके

पोलीसमध्ये येत असल्याने लंके यांनी पोलिसांना सुनावलं. आमच्या कार्यकर्त्यांना पाहू द्या तुम्ही किती काम करता, पाहत आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्याना दम देता सर्व हिसाबा तेरा तारखेला करू

देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली ती संविधान वाचवण्याची वाचवण्यासाठी निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहे या निवडणुकीला आपण यासाठी माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही शेतकरी मरतोय मात्र सरकार काही करत नाही

अप मार्शल निविदा प्रकरणात घोटाळा? जुन्याच टेंडरवर नव्याने काम दिल्याचा प्रकार उघडकीस

मुंबईत नुकत्याच नेमण्यात आलेल्या क्लीन अप मार्शल च्या निविदा प्रक्रिया राबविण्यात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय पवार यांनी केला आहे. क्लीन अप मार्शल प्रक्रिया राबवताना नव्याने टेंडर प्रक्रिया राबवणे आवश्यक असताना 2020 मध्ये निविदा भरलेल्या कंपन्यांनाच काम देण्यात आले असून अनामत रक्कम म्हणून पाच लाख रुपयाची दोन लाख रुपये अनामत रक्कम म्हणून स्वीकारली आहे. शिवाय मुंबईतील 24 विभागांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना ही कामे देणे आवश्यक असताना निवडक तेराच कंपन्यांना ही कामे दिली आहेत. यात मोठ्या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी नगरसेवक संजय पवार यांनी केला असून याप्रकरणी त्यांनी पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नरेंद्र मोदींनी 60 कोटी तरुणांना मुद्रा लोन दिलं; देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 26 पक्षाची खिचडी आहे

मोदीच्या गाडीत सर्व समाजाच्या लोकांना बसण्यासाठी जागा आहे....

इंजिनसाठी इंडियात भांडणे....त्यांच्या इंजिनामध्ये जागाच नाही...

20 कोटी लोकांना पककी घरे दिले...

60 कोटी लोकांना स्वच्छ पाणी दिले...

60 कोटी तरूणांना देशामध्ये मुद्रा लोन दिले...

80 लाख बचत गट तयार केले.

10 कोटी महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या...

55 कोटी लोकांना मोफत उपचार

Lok Sabha 2024: पुढील २४ तासात उर्वरित सर्व जागांची घोषणा महायुतीकडून केली जाणार

पुढील २४ तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा महायुतीकडून केली जाणार

ठाणे, नाशिक दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला सूत्रांची माहिती

तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरूच

ठाण्यातून प्रताप सरनाईक व नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर

तर दक्षिण मुंबईतून मंगलप्रभात लोढा व यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा

नाशिकच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम

पुणे शहर मनसेचा आज मेळावा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मेळाव्याचे आयोजन

पुण्यातील सेंट्रल पार्क मध्ये मेळाव्याचे आयोजन

मनसे शहर अध्यक्ष यांच्यासह महायुतीचे क्लस्टर प्रमुख मंत्री चंद्रकांत पाटील मेळाव्याला उपस्थितीत राहणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने युतीला पाठिंबा दिला आहे

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात, बाईक रायडर तरुणाचा  जागीच मृत्यू

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बाईक रायडर तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू

लोणावळ्या जवळील शिलाटने फाटा येथे भीषण अपघात झाला.

दुचाकीवरून वेगात जात असलेल्या बाईक रायडर तरुणाला पिकअप टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला.

कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक संपली

कोल्हापूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक संपली

तब्बल दोन तासानंतर संपली बैठक

हातकणंगले आणि कोल्हापूरच्या प्रचाराची रणनीती अखल्याची हसन मुश्रीफ यांची माहिती

दोन्ही उमेदवार सेनेचे असल्याने मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेऊन आहेत

ऑन संजय राऊत

त्यांना रोज काही तरी बोलावे लागते त्यामुळे ते बोलत आहेत

ते बोलले की तुम्ही आमच्या प्रतिक्रिया घेता

इंडिया आघाडीत डब्बे नाही, प्रत्येकाला इंजिन बनायचं आहे; देवेंद्र फडणवीस

इंडिया आघाडीत डब्बे नाहीयेत, आणि तिथे प्रत्येकाला इंजिन बनायचं आहे

राहुलजींच्या इंजिन मध्ये सोनियाजी

पवार साहेबांच्या इंजिनात सुप्रियाताई

उद्धवजीयांच्या इंजिनात फक्त आदित्यला बसायला जागा आहे

सामान्य माणसाला बसायला तिथे जागा नाही, असं देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहेत.

नाशिकच्या जागेवरुन छगन भुजबळांचा महायुतीला खोचक टोला

नाशिकच्या जागेवरुन महायुतीत अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. नाशिकची जागा आपल्याच पक्षाला मिळणार, असा दावा शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाचे नेते करीत आहेत. त्यामुळे नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. दरम्यान, छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरुन महायुतीला खोचक टोला लगावला आहे. 20 मे हा नाशिक लोकसभेच्या मतदानाचा दिवस आहे. तोपर्यंत तरी येथे उमेदवार जाहीर करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे

शरद पवार हे देशाचे शक्तीशाली नेते : संजय राऊत

शरद पवार देशातील शक्तीशाली नेते असून बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार यांच्या प्रचारार्थ संजय राऊत आज बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार टीका केली. मोदींनी देश वाऱ्यावर सोडलाय असंही राऊत म्हणाले.

नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती

रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा यासाठी भाजपने मोठी रणनिती आखली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ६ जणांची संघटनात्मक नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये आमदार, माजी मंत्री, खासदार, जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे.

PM मोदींची उद्या पुण्यात सभा; भाजपकडून जोरदार तयारी सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या म्हणजेच सोमवारी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी वानवाडीतील रेसकोर्स मैदानावर सभा घेणार आहेत.

यासाठी चारही मतदारसंघांतून सुमारे दोन लाख नागरिक उपस्थित राहतील, त्या अनुषंगाने महायुतीतील सर्व घटक पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

शरद पवारांचा विश्वासू शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

शरद पवार यांचे विश्वासू सहकारी व पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच आज संध्याकाळी सोलापूर येथे देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. त्यानंतर काल अभिजीत पाटील यांनी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये भाजपमध्ये जाण्यावर चर्चा झाली. त्यानंतर आज अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

निलेश लंकेंच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात; अहमदनगरमध्ये आज ३ सभा घेणार

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार आज नगरमध्ये तीन मोठ्या सभा घेणार आहेत. या सभेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार? याकडे अहमदनगरकरांचं लक्ष लागून आहे.

Devendra Fadnavis Sabha: माढ्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तीन सभा

बहुचर्चित असलेल्या माढा लोकसभा मतदार संघात आज महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिवसभरात तीन सभा होणार आहेत.

पहिली सभा दुपारी 12 वाजता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माढा तालुक्यातील वाकाव या गावी होणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमुख शिवाजी सावंत हे कट्टर राजकिय विरोधक एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

दुसरी सभा दुपारी 3 वाजता सांगोला येथे होणार आहे. सायंकाळी सहा वाजता मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या अकलूजमध्ये सभा होणार आहे. मोहिते पाटील यांनी भाजप सोडल्या नंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच सभा अकलूज मध्ये होणार आहे. या सभेला भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित राहणार का या कडे लक्ष लागले आहे.

दरम्यान काॅंग्रेसचे नेते धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतापगड या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत. धवलसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या त्यांच्या माढा दौऱ्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अकलूजच्या सभेत देवेंद्र फडणवीस मोहिते पाटील यांच्या विषयी काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान मोदी १० मेला नाशिक दौऱ्यावर येणार, पिंपळगामध्ये जाहीर सभा घेणार

- १० मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर, सूत्रांची माहिती

- १० मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगावमध्ये सभा

- नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मदारसंघांसाठी मोदींची एकत्रित सभा

- नाशिकच्या पिंपळगावमध्ये मोदींच्या सभेचं नियोजन, सूत्रांची माहिती

- मागील लोकसभा निवडणुकीत देखील पिंपळगावमध्ये झाली होती मोदींची सभा

Nashik Lok Sabha 2024: नाशिकसाठी सोमवार ठरणार पॉलिटिकल ब्लॉकबस्टर

- सोमवारी नाशिकमध्ये महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन

- नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज

- नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार एकत्र भरणार उमेदवारी अर्ज

- उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित

- नाशिकमध्ये उबाठाचे राजभाऊ वाजे तर दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे उमेदवार

- मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत दाखल करणार उमेदवारी अर्ज

- तर शांतीगिरी महाराज देखील रामकुंडावरून भक्त परिवारासह रॅली काढत उमेदवारी अर्ज भरणार

- एकीकडे उद्या महाविकास आघाडीसह शांतीगिरी महाराज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असताना दुसरीकडे अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्यानं नेते, कार्यकर्ते संभ्रमात

डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात; शिरुरमध्ये ५ मोठ्या सभा घेणार

पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण पाच सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे.

शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी, जुन्नर या

विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक सभा होणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ, सभांचे नियोजन

शिरूर - हवेली विधानसभा

२८ एप्रिल - उरळीकांचन, या. हवेली

जुन्नर विधानसभा

३० एप्रिल - ओतूर बाजार, ता. जुन्नर

हडपसर विधानसभा

६ मे - कात्रज

भोसरी विधानसभा

७ मे - मा. आदित्य ठाकरे यांची रॅली

आंबेगाव - शिरूर विधानसभा

८ मे - रांजणगाव, ता. शिरूर

खेड - आळंदी विधानसभा

१० मे - चाकण बाजार समिती आवार

Uddhav Thackeray Sabha: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी येथे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शहरातील जलतरण तलावाजवळील मैदानावर सायंकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंची सभआ होईल.

तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी मनसे मैदानात उतरले आहेत. शहरातील शिर्के हायस्कुल येथे आज सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेला मनसे नेते , अविनाश जाधव , संदिप देशपांडे , नितीन सरदेसाई , प्रकाश महाजन , वैभव खेडेकर , जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांची उपस्थिती असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.