महाकाली, हे नाव जरी ऐकलं तरी आठवते ती आदिशक्ती, ब्रम्हा - विष्णू - महेशही जीच्यासमोर नतमस्तक होतात, अशी अविद्येचं मुंडकं उडवणारी, स्मशानवासिनी, असुरांचे रक्त पिऊन धर्माचे रक्षण करणारी, उग्र काळी काया अशी महाकाली. पण मुंबईतील महाकालीचं आम्ही तुम्हाला एक असं अनैसर्गिक रुप दाखवणार आहोत. (महाकालीला मदर मेरी बनवल्याचे फोटो दाखवा) ही आहे महाकालीची मुर्ती.. होय तुम्ही जे ऐकताय आणि बघताय ते अगदी खरंय. हीच आहे महाकालीची मुर्ती.. ही मुर्ती महाकालीची असून तिचं रुप मात्र ख्रिस्ती समुदायाच्या येशूच्या आईचं म्हणजेच मदर मेरीचं. हे अघटित कुठे आणि कसं घडलंय. पाहा...
चेंबुरमधील आणिक गाव स्मशानभूमीत महाकालीचं मंदिर
22 नोव्हेंबर रोजी मुर्तीचा साजश्रृगांर बदलला
मुर्तीच्या हातात बाळाची बाहुली देण्यात आली
महाकालीचा रंग बदलून पांढरा शुभ्र करण्यात आला
महाकाली मातेचा मदर मेरी सारखा पोशाख करण्यात आला
या भागात खिस्त्री समुदायातर्फे धर्मातरण मोहिम राबवली जाते असं स्थानिकांनी म्हटलंय. ख्रिस्ती धर्माचा 23 नोव्हेंबर रोजी क्राईस्ट द किंग हा सण होता. ख्रिस्ती कॅलेंडरनुसार वर्षांच्या शेवटच्या रविवारी हा सण साजरा होतो. आणि 22 नोव्हेंबर रोजी ही घटना उघड झालीये.स्मशानभूमीत गेलेले नागरिक ज्यावेळी महाकालीचं दर्शन घेण्यासाठी मंदीराच्या गर्भगृहाजवळ गेले तर त्यांना धक्का बसला. महाकालीचं मदर मेरीतील रुप पाहून हादरलेल्या नागरिकांनी आखो देखी सांगितली....
पाहिलंत. नेमकं स्मशानभूमीत महाकाली मातेला कसं बाटवण्यात आलं. यानंतर हा गैर प्रकार कोणी केला यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. पुजारी रमेश पंडित यांने देवी स्वप्नात आली आणि तिनं मदर मेरीच्या रुपात माझा साजश्रृगांर कर असं सांगितलं आणि मी तसं केलं अशी कबूलीच दिली. याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी रमेश पंडितच्या मुसक्या आवळून त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्यातर्गत कलम २९५ अ नुसार गुन्हा दाखल केला. न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे केवळ वेशांतर नाहीये तर हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर केलेला उघडउघड हल्ला आहे! आतापर्यंत लोकांना बाटवणाऱ्या या अदृश्य हातांनी थेट मंदिरात घुसून देवतांनाच बाटवण्याचं धाडस केलं आहे! ५०० वर्षांपूर्वी ज्याप्रकारे क्रूर सत्ताधीशांनी मंदिरं तोडून तिथे मशीदी उभारल्या त्याचीच ही आधुनिक पद्धत.देशात हिंदुत्वाचा पुरस्कार केला जात असताना या कटाचा आणि या पाठीमागच्या अदृश्य हातांचा शोध घ्यावाच लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.