Maharashtra Election Saam tv
मुंबई/पुणे

Pune By-Election 2023: पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या तारखांमध्ये बदल; निवडणूक आयोगाचा निर्णय

Kasba Chinchwad Constituency Election Date: दोन्ही पोटनिवडणुकांसाठी मतदान २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.

Shivaji Kale

Pune By-Election: पुण्यातील दोन जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. कसबापेठ आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार आहे. दोन्ही मतदारसंघात २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बारावी परीक्षा आणि पदवीची परीक्षा असल्यामुळे पुणे पोटनिवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी मतदान २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.  (Latest Marathi News)

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होईल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झालं. भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे ३ जानेवारी रोजी निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT