BBC Documentary : JNU मध्ये मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंट्री स्क्रीनिंगवरून गदारोळ; दगडफेक झाल्याची माहिती, वीज इंटरनेटही बंद

बीबीसीच्या या डॉक्युमेंट्रीला भारतात बॅन केलं आहे. या डॉक्युमेंट्रीचं जेएनयूमध्ये स्क्रीनिंग सुरू असताना अचानक वीज गेली.
JNU News Updates,
JNU News Updates, Saam Tv

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरुन जेएनयूमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. जेएनयूमध्ये दोन गट या मुद्द्यावरुन भिडले असून दगडफेक झाल्याचाही दावा केला जात आहे. अभाविप आणि डाव्या विद्यार्थ्यांमध्ये ही दगडफेक झाली आहे. यासोबतच जेएनयूतील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

भारतात 2002मध्ये गुजरात मध्ये झालेल्या दंगली संदर्भात बीबीसीच्या एका डॉक्युमेंट्रीवर भारत सरकारने जोरदार आक्षेप घेतला आहे. बीबीसीच्या या डॉक्युमेंट्रीला भारतात बॅन केलं आहे. या डॉक्युमेंट्रीचं जेएनयूमध्ये स्क्रीनिंग सुरू असताना अचानक वीज गेली. विद्यार्थ्याचा असा आरोप आहे की, ही वीज विद्यापीठाने कट केली आहे. तर विद्यापीठाच्या विद्युत विभागातील काही लोकांचं म्हणणं आहे की, वीजेच्या तारेत मोठा बिघाड झाल्यानं वीज गेली. (Latest Marathi News)

JNU News Updates,
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर दहशतवादाचं सावट; मुंबईतील हालचालींनी तपास यंत्रणा सतर्क

वीज गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी ही डॉक्यूमेंट्री मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहिली. दरम्यान जेएनयूच्या छात्रसंघाची अध्यक्षा आइषी घोष हिने हे स्क्रीनिंग सुरू असताना अभाविपने दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये काही लोक जखमी झाल्याचा आरोप देखील छात्रसंघाची अध्यक्ष आइशी घोष हिने केला आहे.तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं. आइशी घोष हिने २५ जणांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.

JNU News Updates,
Aaditya Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'CM शिंदे कार्यक्रमात...'

दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनात तक्रार करणार असल्याचंआइषी घोषने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. बीबीसीच्या विरोधात 13 माजी न्यायाधीश, 133 माजी सनदी अधिकारी आणि 156 माजी सैनिकांनी हस्ताक्षर असलेले पत्र केलं जारी केलं आहे. बीबीसीचं एकाच बाजूने रिपोर्टिग असल्याचं अधिकारी आणि माजी न्यायाधीशांचा दावा आहे.

हस्ताक्षर करणाऱ्या व्यक्तीमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अनिल देव सिंह, माजी गृह सचिव एल. सी. गोयल, माजी परारष्ट्र सचिव शशांक, माजी रॉ प्रमुख संजीव त्रिपाठी आणि एनआयए माजी अधिकारी योगेश चंद्र मोदी यांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com