Baramati : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती (baramati) दाै-यावर असताना ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यासह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी अशा प्रमुख नेत्यांवर टीका केली. यामध्ये प्रामुख्याने बावनकुळेंचा राेख ठाकरेंवर हाेता. त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना समजून जाईल त्यांचे काय चुकलं असे म्हटलं आहे. (chandrashekhar bawankule latest marathi news)
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले उद्धवजी आजकाल जे काही बोलतात ते फर्स्ट्रेशनमधून बोलतायत. त्यांना रोज झटके बसताहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना रोज ४४० व्होल्टेजचा करंट देताहेत. त्यामुळे ते त्या मानसिकतेतून बोलताहेत. जेव्हा महापालिकेचे मतदान होईल तेव्हा त्यांना कळेल की आपल्या हातून काय चूक झाली असेही बावनकुळेंनी नमूद केले. ते म्हणाले हिंदुत्वापासून ते किती दूर गेलेत हे त्यांना आज नाही कळणार. त्यांचं जे बोलणं आहे ते फर्स्ट्रेशनमध्येच आहे. दुसरं काही नाही.
शहांची मदत, पवारांचा ट्रॅप
चंद्रशेखर बावनकुळे यांना मंगलमूर्ती अमंगलमूर्ती यावर विचारलं असता ते म्हणाले अमित शहा हे उद्धवजी ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत बोलले नाहीत. त्यांनी भाजपसोबत कसा दगा झाला हे मांडलं. आता दगा करणारे आणि दग्यामुळे त्यांचे झालेले नुकसान यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले. यातूनच त्यांनी अमित शहा यांच्यावर टिका करण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत शिवसेनेचं जे काही चांगलं झालं ते अमित शहा यांच्या नेहमीच्या मध्यस्थीमुळे, सामंजस्याने सांभाळून घेतल्यामुळे झालं. पण अमित शहा यांनी केलेली मदत विसरुन पवारसाहेबांच्या ट्रॅपमध्ये आहेत. म्हणून अमित शहा यांनी केलेली सर्व मदत विसरले आहेत. शरद पवारसाहेब यांच्या ट्रॅपमध्ये येवून ते अशी वक्तव्ये करताहेत असेही बावनकुळेंनी म्हटलं
बुमरॅंगचा काही प्रश्न नाही
बारामती काबीज करणार का ? याव बावनकुळे म्हणाले आम्ही आमची तयारी करतो. पाच वर्षे तयारी करतो. आमचा नेहमीचाच संघटना वाढवण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये २०१९ मध्ये सर्वाधिक मते मिळाली. फरक किती राहिला ? त्यानंतर हर्षवर्धन पाटील आमच्यात आले. आम्हीही तयारी करतोय. मी जबाबदारीने सांगतो आम्ही १ लाख मताने बारामती जिंकू. यात काहीच शंका नाही.
सर्व निवडणुका भाजप-सेना युतीच जिंकेल
आम्ही कुणाच्या विरोधात काही बोलतच नाही. आम्ही आमची तयारी करतोय. आम्हांला खासदारांवर, त्यांच्या कामावर, त्यांच्या पक्षावर काही बोलायचं नाही. आम्ही आता पक्ष वाढवतोय. आमचा पक्ष मजबूत करणे, योजना राबवणे यात खेलो होबे नाहीये. आम्ही आमचा पक्ष वाढवतोय आणि तो इतका वाढवू की पुढच्या सर्व निवडणुका भाजप-सेना युतीच जिंकेल असा दावा बावनकुळेंनी केला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.