konkan Ganpati Special Train 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Ganpati Special Train: बाप्पा पावला रे! गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून स्पेशल गाड्या, चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखाचा

Ganpati Train Konkan : मध्य रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सवासाठी आतापर्यंत २२२ गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ganpati Train Konkan : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागू नये म्हणून मध्य रेल्वेनेकडून आणखी २० अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सात ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण सुरु होणार आहे. मध्य रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सवासाठी आतापर्यंत २२२ गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.

या सर्व गणपती विशेष गाड्यांची बुकिंग सात ऑगस्टपासून सुरु होणार आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर असेल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आलेय. २० गाड्यासंदर्भातील सर्व माहिती जाणून घेऊयात...

१) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या)

01031 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दि.०६.०९.२०२४, दि.०७.०९.२०२४, दि.१३.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी २०:०० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)

01032 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४, दि. ०८.०९.२०२४, दि. १४.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी रात्री ०८:४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी १७:१५ वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

संरचना: २ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२१ डब्बे)

२) पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)

01443 विशेष गाडी पनवेल येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी ०४:४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

01444 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०१:३० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे: पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)

३) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)

01447 विशेष गाडी पुणे येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

01448 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)

४) पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या)

01441 विशेष गाडी दि. ११.०९.२०२४ रोजी ०४:४० वाजता पनवेल येथून सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

01442 विशेष गाडी दि. १०.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०१:३० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

थांबे: पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

संरचना: ३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२० डब्बे)

५) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या)

01445 विशेष गाडी दि. १०.०९.२०२४ रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

01446 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ११.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

संरचना: ३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२० डब्बे)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT