मुंबई : मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे चार मार्गिका उपनगरीय लोकलसाठी आणि दोन मार्गिका मेल, एक्स्प्रेससाठी तयार करण्यात आल्या आहेत. आता अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे वाढीव फेरी ही एसी लोकलची चालविण्याचे नियोजन मध्य रेल्वे (Railway) प्रशासनाकडून केले जात आहे. (Central Railway to hire ac local trains)
मध्य रेल्वेवर 2019 पासून लोकल (Mumbai Local) वेळापत्रकात वाढीव लोकल फेऱ्या चालविण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त लोकल फेऱ्या मिळत नव्हत्या. परिणामी, धक्काबुक्की, जीवघेणा प्रवास प्रवाशांना करावा लागत होता. मात्र, 14 वर्षांनी ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप लोकलचा वेगात प्रवास सुरू झाला नाही.
लोकल सेवा ठाणे ते दिवा दरम्यान संथ गतीने जात आहे. येत्या काही दिवसात हा वेग वाढविला जाण्याचा आशावाद मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर मध्य रेल्वेद्वारे नवीन वेळापत्रक तयार केले जाईल. यात किती एसी किंवा नाॅन एसी लोकल चालविण्याचे नियोजन, एसी लोकल जलद मार्गावर चालविण्याचे नियोजन केले जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या चार एसी लोकलचे रेक आहेत. यातील तीन एसी लोकलचा वापर केला जातो. तर, एक लोकल राखीव ठेवली आहे. ज्यावेळी इतर तीनपैकी एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा लोकलला विश्रांती देण्यासाठी या लोकलचा वापर केला जातो. तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणि वीकेण्डला एसी लोकलची सुविधा नसते. त्यावेळी सर्व एसी लोकलची तांत्रिक दुरूस्ती केली जाते.
त्यामुळे सध्याच्या घडीला मध्य रेल्वे ताफ्यात जादा एसी लोकल नसल्याने मुख्य मार्गिकेवर वाढीव एसी लोकलची फेरी चालविणे अवघड आहे. मात्र, पश्चिम रेल्वेकडे पाच एसी लोकल असून दोन एसी लोकल धावतात. या एसी लोकल आलटून पालटून वापरल्या जातात. तरी, पश्चिम रेल्वेकडे एक एसी लोकलचा रेक जादा असल्याने तीनपैकी एक एसी लोकल मध्य रेल्वेला देण्याची शक्यता आहे. दरम्यान,अद्याप लोकलचे वेळापत्रक तयार झाले नाही, त्यामुळे काही सांगता येणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.