6 December Mahaparinirvan 2023 Saam tv
मुंबई/पुणे

6 December Mahaparinirvan 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ विशेष फेऱ्या, वाचा सविस्तर वेळापत्रक

Mahaparinirvan 2023 local train update: महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर येतात. या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने मंगळवार-बुधवारी मध्यरात्री विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

Baba Saheb Ambedkar death anniversary:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर येतात. या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने मंगळवार-बुधवारी मध्यरात्री विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने कल्याण-परळ आणि पनवेल-कुर्ला स्थानकांदरम्यान १२ विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मध्य रात्री चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्या या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेन लाईनवर विशेष फेऱ्या

मध्य रेल्वेच्या मेन लाईवर परळ-कल्याण अप मार्गावर मध्यरात्री पावणे एक वाजता कुर्ला-परळ विशेष लोकल सुटणार आहे. तर कल्याण-परळ विशेष कल्याण येथून १ वाजता सुटेल आणि परळ येथे मध्यरात्री २.१५ वाजता पोहोचेल.

ठाणे- परळ विशेष गाडी ठाणे येथून मध्यरात्री २.१० वाजता सुटणार आहे. तर परळ येथे २.५५ वाजता पोहोचेल.

परळ-कल्याण डाऊन मार्गावर पहिली विशेष परळ-ठाणे लोकल परळ येथून १.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे १.५५ वाजता पोहोचेल.

परळ- कल्याण विशेष लोकल परळ येथून २.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३.४० वाजता पोहोचेल. परळ-कुर्ला विशेष लोकल परळ येथून ३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.२० वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर विशेष फेऱ्या

हार्बर अप मार्गावर वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून १.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे २.१० वाजता पोहोचेल.

पनवेल- कुर्ला विशेष गाडी पनवेल येथून १.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे २.४५ वाजता पोहोचेल. वाशी-कुर्ला विशेष गाडी वाशी येथून ३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.४० वाजता पोहोचेल. डाऊन मार्गावर कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून २.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ३ वाजता पोहोचेल.

कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून ३ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ४ वाजता पोहोचेल. कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून ४ वाजता सुटेल आणि वाशी येथे ४.३५ वाजता पोहोचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : आल्याची पेस्ट अशा पद्धतीने बनवा, १ महिना खराब होणार नाही

Bigg Boss 19 : क्रिकेटपटूच्या बहिणीने तान्या मित्तलच्या कानाखाली मारली? बिग बॉसच्या घरात घडलं काय? पाहा VIDEO

Maharashtra Politics: फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा कायम? निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत धुसफूस

Cyclone Alert :  चक्रीवादळाचा इशारा, हिवाळ्यात पाऊस धुमाकूळ घालणार, या राज्यांना अलर्ट

PM Matru Vandana Scheme: सरकारची खास योजना! गरोदर महिलांना मिळतात ११,००० रुपये; योजनेत अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT