Special Power Block Near Kasara Saam TV
मुंबई/पुणे

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Priya More

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर २० ऑक्टोबर आणि २१ ऑक्टोबर म्हणजे रविवार आणि सोमवारी स्पेशल पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कसारा रेल्वे स्थानकावर नॉन इंटरलॉकींग कामांसाठी हा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेसेवेवर परिणाम होणार आहे. या पॉवर ब्लॉकमुळे अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत तर काहींचे शॉर्ट टर्मिनेशन्स करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कसारा रेल्वे स्थानकावरील डाउन यार्डमधील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ आर ॲंड डी लाईन्सच्या विस्तारासाठी आणि रुंदीकरणासाठी कसारा रेल्वे स्थानकावर नॉन इंटरलॉकींग कामांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे. उपलब्ध कॉरिडॉर मार्जिनसह पूर्व नॉन इंटरलॉकींग कामे प्रगतीपथावर आहेत आणि नॉन इंटरलॉकींग रविवारी आणि सोमवारी केले जाणार आहे. हा पॉवर ब्लॉक रविवारी ३.२० वाजता सुरू होईल आणि सोमवारी १.२० वाजता संपेल. म्हणजे तब्बल २२ तासांचा हा विशेष पॉवर ब्लॉक असणार आहे.

असा असेल पॉवर ब्लॉक -

डाउन लाइनवर २० ऑक्टोबर २०२४ म्हणजे रविवारी १०.४० वाजल्यापासून ते दुपारी १.४० वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक असेल.

अप लाइनवर २० ऑक्टोबर २०२४ रोजी १२.४० वाजल्यापासून ते १.४० वाजेपर्यंत म्हणजे १ तासाचा पॉवर ब्लॉक असेल.

अप आणि डाउन लाईन्स एकत्रित २० ऑक्टोबर २०२४ रोजी म्हणजे रविवार ७.२० वाजल्यापासून ते २१ ऑक्टोबर २०२४ म्हणजे सोमवारी १.२० वाजेपर्यंत म्हणजे ६ तासांचा पॉवर ब्लॉक असेल.

या ट्रेन रद्द -

11012 धुळे - छञपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस

11011 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- धुळे एक्स्प्रेस

शॉर्ट टर्मिनेशन्स -

12140 नागपूर- छञपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली नाशिक रोड येथे रद्द होईल.

12187 जबलपूर - छञपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीबरथ एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर २०२४ मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेट होईल

शॉर्ट ओरीजनेटींग -

12139 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर सेवाग्राम २० ऑक्टोबर २०२४ रोजी नाशिक रोड येथून ६.३० वाजता सुटेल (छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- नाशिक रोड दरम्यान रद्द)

12188 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस - जबलपूर गरीब्रथ एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ मनमाड येथून ५.५५ वाजता सुटेल (छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- मनमाड दरम्यान रद्द)

अप गाड्यांचे डायव्हर्शन -

11072 बलिया- लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल

11058 अमृतसर-छञपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल.

22537 गोरखपुर-लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल.

11062 जयनगर -लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल.

05069 छपरा-पनवेल विशेष १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल.

18030 शालिमार -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स प्रेस १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल.

12810 हावडा -छञपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स प्रेस १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल.

12860 हावडा- छञपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली जळगाव -नंदुरबार- भेस्तान- वसई रोड मार्गे वळवली जाईल.

17611 नांदेड-छञपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत मार्गे वळवली जाईल.

15018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत मार्गे वळवली जाईल.

17618 नांदेड-छञपती शिवाजी महाराज टर्मिनस तपोवन एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत मार्गे वळवली जाईल.

20822 संत्रागाची-पुणे हमसफर एक्सेप्रेस १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे मार्गे- पुणे मार्गे वळवली जाईल.

12742 पाटणा-वास्को द गामा एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत - कल्याण-पनवेल मार्गे वळवली जाईल.

01026 बलिया- दादर स्पेशल १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत - कल्याण मार्गे वळवली जाईल.

01139 नागपूर- मडगाव स्पेशल १९.१०.२०२४ रोजी सुटलेली मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत - कल्याण मार्गे वळवली जाईल.

05585 रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली मनमाड- अहमदनगर-दौंड मार्गे मार्गे- पुणे- लोणावळा -कर्जत - कल्याण-पनवेल मार्गे वळवली जाईल.

07197 काझीपेठ-दादर स्पेशल १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली नांदेड-परभणी- लातूर रोड- लातूर -कुरुडूवाडी-दौंड- पुणे- लोणावळा -कर्जत- कल्याण मार्गे वळवली जाईल.

डाऊन गाड्यांचे डायव्हर्शन -

12137 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- फिरोजपूर पंजाब मेल २० ऑक्टोबर २०२४ दिवा - वसई रोड-भेस्तान- नंदुरबार-जळगाव मार्गे वळवली जाईल.

12145 लोकमान्य टिळक टर्मिनस- पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ दिवा -वसई रोड- भेस्तान- नंदुरबार- जळगाव मार्गे वळवली जाईल.

12261 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस -हावडा दुरांतो एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ दिवा - वसई रोड - भेस्तान- नंदुरबार - जळगाव मार्गे वळवली जाईल.

17617 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस - नांदेड तपोवन एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली कल्याण- कर्जत- लोणावळा- पुणे- दौंड -अहमदनगर -मनमाड मार्गे वळवली जाईल.

12105 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली कल्याण -कर्जत- लोणावळा -पुणे- दौंड अहमदनगर- मनमाड मार्गे वळवली जाईल.

12111 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमरावती एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली कल्याण -कर्जत- लोणावळा -पुणे- दौंड अहमदनगर- मनमाड मार्गे वळवली जाईल.

12289 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली कल्याण -कर्जत- लोणावळा -पुणे- दौंड अहमदनगर- मनमाड मार्गे वळवली जाईल.

11401 छञपती शिवाजी महाराज टर्मिनस- बल्हारशाह नंदीग्राम एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली कल्याण -कर्जत- लोणावळा -पुणे- दौंड अहमदनगर- मनमाड मार्गे वळवली जाईल.

05586 लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली कल्याण -कर्जत- लोणावळा -पुणे- दौंड अहमदनगर- मनमाड मार्गे वळवली जाईल.

07198 दादर-काझीपेठ एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी सुटलेली कल्याण- कर्जत- लोणावळा- पुणे- दौंड-कुरुडूवाडी- लातूर- लातूर रोड- परभणी- नांदेड मार्गे वळवली जाईल.

ट्रेनचे वेळापत्रक -

11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर गोदान एक्सप्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी ११.५५ वाजता (१०.५५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल

12869 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हावडा साप्ताहिक सुपरफास्ट २० ऑक्टोबर २०२४ रोजी ११.३५ वाजता (११.०५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल.

17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नांदेड राज्यराणी एक्सप्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी २३.४५ वाजता (१८.४५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल.

12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा मेल २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ००.१० वाजता (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २१.१० वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल.

17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेस २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ००.०० वाजता (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २१.३० वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल.

18029 लोकमान्य टिळक टर्मिनस - शालिमार एक्स्प्रेस दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ००.३० वाजता (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २२.०० वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल.

12322 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा एक्स्प्रेस २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ००.१५ वाजता (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २२.१५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल.

12167 लोकमान्य टिळक टर्मिनस -बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ००.४५ वाजता (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २२.४५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल.

12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ०१.३५ वाजता (दि. २०.१०.२०२४ रोजीच्या २३.३५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल.

22224 साईनगर शिर्डी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस २० ऑक्टोबर २०२४ रोजी २०.४५ वाजता (१७.४५ वाजता ऐवजी) पुन: निर्धारित केले जाईल.

गाड्यांचे नियमन - ( १९ ऑक्टोबर रोजी खालील गाड्या १ ते २ तासांनी नियमित केल्या जातील.)

12142 पाटलीपुत्र- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

11080 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

11060 छपरा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

12162 आग्रा छावणी- लोकमान्य टिळक टर्मिनस लष्कर एक्स्प्रेस

14314 बरेली -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

12294 प्रयागराज- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस

(वरील रेल्वे गाड्यांना वसई रोड, भिवंडी रोड आणि ठाणे स्थानकांवर वसई रोड मार्गे वळवलेल्या सर्व अप आणि डाऊन गाड्यांसाठी २ मिनिटांचा अतिरिक्त थांबा दिला जाईल.)

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे कामकाज -

२० ऑक्टोबर २०२४ रोजी ८ सेवा रद्द केल्या जातील

२२ सेवा योग्य स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट होतील.

२२ सेवा योग्य स्थानकांवर शॉर्ट ओरीजनेट होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT