Mumbai Central Railway Local Train Sunday Mega Block Saam tv
मुंबई/पुणे

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, रविवारी प्रवाशांचा खोळंबा होणार; कसं आहे रेल्वेचे वेळापत्रक?

central railway mega block : मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घोषणा करण्यात आलीये. या मेगाब्लॉकमुळे रविवारी प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

मध्य रेल्वेकडून रविवारी मेगाब्लॉक घोषित

माटुंगा– मुलुंड रेल्वे स्टेशनदरम्यान हा मेगाब्लॉक

मेगाब्लॉकदरम्यान गर्दीतून प्रवास करावा लागणार

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबईत मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. रेल्वेने रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामे करण्यासाठी मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा– मुलुंड रेल्वे स्टेशनदरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे या ब्लॉक कालावधित प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

मुख्य मार्गावर कसं असेल नियोजन?

माटुंगा – मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ११.०५ ते १५.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.३६ ते १५.१० वाजेदरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानक येथून डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर गंतव्य स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून ११.०३ ते १५.३८ वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानक येथून अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावरून या गाड्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर गंतव्य स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावर कसं असेल वेळापत्रक?

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.१६ ते १६.४७ वाजेदरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा तसेच १०.४८ ते १६.४३ वाजेदरम्यान बांद्रा / गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल / बेलापूर / वाशी स्थानक येथून ९.५३ ते १५.२० वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा, गोरेगाव / बांद्रा स्थानक येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी १७.१३ वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना १०.०० ते १८.०० वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT