Hair Care: केस धुताना शॅम्पू एकदा लावावा की दोनदा, जाणून घ्या ही सिक्रेट टिप

Shruti Vilas Kadam

केसांची स्थिती महत्त्वाची

जर केस खूप तेलकट, धुळकट किंवा स्टायलिंग प्रॉडक्ट्स वापरले असतील तर दोनदा शॅम्पू लावणे फायदेशीर ठरते. सामान्य केसांसाठी एकदाही पुरेसा असतो.

Hair Wash Tips | Saam tv

पहिला शॅम्पू – घाण काढण्यासाठी

पहिल्यांदा लावलेला शॅम्पू टाळूवरील तेल, घाण आणि प्रॉडक्ट बिल्डअप काढण्याचे काम करतो. त्यामुळे फेस कमी येणे स्वाभाविक आहे.

Hot Water Hair Wash | GOOGLE

दुसरा शॅम्पू – खोलवर स्वच्छता

दुसऱ्या वेळी शॅम्पू लावल्यास जास्त फेस येतो आणि टाळू अधिक स्वच्छ होते. विशेषतः ऑयली स्काल्पसाठी ही पद्धत उपयोगी ठरते.

Hair Wash | GOOGLE

ड्राय केसांसाठी काळजी

जर तुमचे केस कोरडे असतील तर दोनदा शॅम्पू लावल्याने अधिक कोरडेपणा येऊ शकतो. अशावेळी सौम्य आणि मॉइश्चरायझिंग शॅम्पू एकदाच वापरणे चांगले.

Hair Wash Tips | Canva

शॅम्पूचे योग्य प्रमाण वापरा

जास्त शॅम्पू वापरण्याची गरज नाही. नाण्याएवढे (coin-size) प्रमाण पुरेसे असते. जास्त प्रॉडक्टमुळे केस रफ होऊ शकतात.

Hair Wash | Social Media

टाळूवर लावा

शॅम्पू नेहमी टाळूवर लावा, केसांच्या टोकांवर नाही. टोकांवर फेस आपोआप जातो, त्यामुळे ते स्वच्छ होतात.

Hair Wash

कंडिशनर विसरू नका

शॅम्पूनंतर कंडिशनर वापरणे आवश्यक आहे. यामुळे केस मऊ, गुळगुळीत आणि हायड्रेटेड राहतात.

Frezzy Hair | Canva

Skin Care Routine For Dry Skin: ड्राय त्वचेवर नॅचरल ग्लो आणण्यासाठी परफेक्ट रूटीन काय?

Face Care
येथे क्लिक करा