थर्टी फर्स्टसाठी फिरायला जाण्याचा प्लान करताय? लोणावळ्यातील महत्त्वाचे पॉईंट्स राहणार बंद; कारण काय?

Lonavala tourist spots : थर्टी फर्स्टसाठी फिरायला जाण्याऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. लोणावळ्यातील महत्त्वाचे पॉईंट्स बंद राहणार आहेत.
Lonavala tourist
Lonavala tourist spots :Saam tv
Published On
Summary

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर पॉईंट राहणार बंद

नववर्ष आणि नाताळ सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते

सुरक्षितता आणि गर्दी नियंत्रणासाठी वनविभागाचा निर्णय घेण्यात आलाय.

दिलीप कांबळे, साम टीव्ही

थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षांच्या पार्टीसाठी पर्यटकांची प्लानिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पार्टीसाठी अनेक पर्यटकांचा ओढा महाबळेश्वर, अलिबाग, मालवण, गोव्याकडे जाण्याचा असतो. तर काही पर्यटक लोणावळ्यालाही जाणे पसंत करतात. मात्र, लोणावळ्याला जाण्याचा प्लानिंग करणाऱ्यांचा हिरमोड होणार आहे. कारण लोणावळ्यातील महत्त्वाचे यंदा बंद राहणार आहे.

Lonavala tourist
Mahayuti Politics : महायुतीत जागांसाठी रस्सीखेच; जागावाटपात शिंदेसेनेचा वेगळाच फंडा, VIDEO

नाताळ आणि नववर्षांच्या सुट्ट्या सुरू झाल्याने राज्यातील शहरी भागात राहणाऱ्या नागरिक पर्यटनासाठी रवाना झालेत. मुंबई, पुण्यात राहणाऱ्या पर्यटकांची सुट्ट्यानिमित्त पार्टी करण्यासाठी पसंती ही लोणावळा आणि खंडाळ्याला असते. पर्यटकांना या ठिकाणी भेट देण्याची मोठी उत्सुकता असते.

डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत ही ठिकाणे पर्यटकांना अधिक आकर्षक ठरतात. त्यामुळे या भागात पर्यटकांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. पर्यटकांच्या पसंतीच्या लोणावळ्याचील काही पॉइंट्स बंद राहणार आहेत. वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

Lonavala tourist
'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

कोणत्या पॉईंट्सवर बंदी?

सुट्ट्यांच्या दिवशी लोणवळ्यात पर्यटकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला कठीण जाते. नाताळ आणि नववर्षांच्या सुट्टीमुळे मुंबई-पुणे महामार्गावर प्रवासी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील दोन प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर वनविभागने बंदी जाहीर केलीये.

Lonavala tourist
Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी दोन दिवसांसाठी लायन्स आणि टायगर पॉइंट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे अनेक पर्यटकांचा न्यू इयर प्लॅनमध्ये मोठा अडथळा निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com