मध्य रेल्वेने स्थापित केले “रेस्टॉरंट ऑन व्हील्स” सुमित सावंत
मुंबई/पुणे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रथमच मध्य रेल्वेचे “रेस्टॉरंट ऑन व्हील्स”

रूळांवर ठेवलेले 'रेस्टॉरंट कोच' छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हेरिटेज गल्ली येथे, प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या समोर आहे.

सुमित सावंत साम टिव्ही मुंबई

मुंबई - कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत नवनव्या संकल्पना (इनोव्हेटिव्ह आयडियाज) अंतर्गत मध्य रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे  ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ स्थापित केले आहे.  हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वे कोच वापरून बनवण्यात आले आहे, जे या भागातील खाद्यालय  बनेल.  रूळांवर ठेवलेले 'रेस्टॉरंट कोच' छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हेरिटेज गल्ली येथे, प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या समोर आहे.  हेरिटेज गल्लीमध्ये नॅरोगेज लोकोमोटिव्ह्ज, जुन्या प्रिंटिंग प्रेसचे भाग इत्यादींसह विविध रेल्वे कलाकृती आहेत. याला फ्रीवे मार्गे उपनगराला सहज कनेक्टिव्हिटी आहे.  

“रेस्टॉरंट ऑन व्हील्स” एक उत्तम जेवणाचे ठिकाण असेल जे जेवणाऱ्यांना एक अनोखा अनुभव देईल. कोचमध्ये १० टेबलसह ४० व्यक्ती राहतील.  रेस्टॉरंटचे आतील भाग अशा प्रकारे सजवले गेले आहे की प्रवासी तसेच लोकांना, रेल्वे-थीम असलेल्या सेटिंगमध्ये जेवणाचा अनुभव घेऊ शकतील.

परवाना कालावधी एक वर्ष आहे आणि कामगिरीच्या आधारावर वाढवता येणार आहे. परवानाधारक त्यांच्या स्वतःच्या खर्चाने ॲप्रोच कॉरिडॉर/ आजूबाजूची देखरेख करण्यासाठी जबाबदार असेल. अन्न भेसळ कायदा आणि इतर वैधानिक कायद्यांचे अनुपालन परवानाधारकाने करावयाचे आहे. सुरक्षेचा पैलू लक्षात घेऊन पोर्टेबल अग्निशामक यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत तसेच कर्मचाऱ्यांना उपकरणांच्या वापराचे ज्ञान आहे. अग्निशामकांची वैधता वेळोवेळी घेण्यात येईल आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी केली जाईल.

रेस्टॉरंटचे दर आणि मेनू रेल्वेने मंजूर केलेल्या बाजार दरांनुसार परवानाधारकाद्वारे निश्चित केले जातील. उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, कॉन्टिनेन्टल आणि इतर पाककृती येथे उपलब्ध असतील. शासनाच्या रेस्टॉरंट्ससाठी असलेल्या सर्व विद्यमान कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून रेस्टॉरंट काम करेल. लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपूरी येथील स्थानकांत अशीच उपाहारगृहे उघडण्यासाठीची शक्यता शोधण्यात येत आहे. याशिवाय, मध्य रेल्वेने नागपूर, आकुर्डी, बारामती, चिंचवड आणि मिरज या पाच ठिकाणासाठी निविदा काढल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patole : देवेंद्र फडणवीस स्वत: निवडून येणार नाहीत; अमित शहांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Updates: मिरारोडमध्ये पोलिस ठाण्यात हाणामारी

Sambhaji Raje Chhatrapati : 'छत्रपती शिवरायांचे गुरु फक्त...'; अमित शहांच्या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया

IND vs SA 1st T20I: पहिला टी-२० सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Election : महिला नेत्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली तर कठोर कारवाई; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

SCROLL FOR NEXT