Mumbai Local News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेरळ- भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी, बदलापूर ते कर्जत वाहतूक ठप्प

Central Railway Disrupted: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसामुळे नेरळ ते भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळावर पाणी आले. याचा परिणाम लोकलसेवेवर झाला आहे.

Priya More
  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळी

  • नेरळ-भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळावर पाणी

  • बदलापूर-कर्जत लोकल सेवा ठप्प

  • सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत

  • मुंबईकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत असून प्रवाशांची मोठी गैरसोय

अजय दुधाने, उल्हासनगर

मुंबईसह ठाण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेला बसत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. नेरळ- भिवपूरी रेल्वे स्थानकावर पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या कर्जतवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल वाहतुकीला फटका बसला. बदलापूर ते कर्जत लोकलसेवा ठप्प झाली आहे. तर बदलापुरवरून मुंबई्च्या दिशेने येणारी लोकलसेवा उशिराने धावत आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने नोकरीसाठी येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे नेरळ- भिवपुरी रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर पाणी आलं आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे याचा परिणाम रेल्वेसेवेवर झाला आहे. खबरदारी म्हणून बदलापूर ते कर्जत रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बदलापूरपासून कर्जतपर्यंतच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

कर्जतकडून जाणाऱ्या कोणत्याच गाड्या मुंबईच्या दिशेने येत नाही. मुंबईवरून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या बदलापूर आणि नेरळपर्यंत चालवल्या जात आहे. तिथून त्या लोकल मुंबईच्या दिशेने रवाना केल्या जातात. पण या लोकल देखील उशिराने धावत आहेत त्यामुळे कर्जतकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्यांचे हाल होत आहे. सलग आठवड्याच्या चौथ्या दिवशी मुंबईकरांची गैरसोय झाली आहे. लोकल नसल्यामुळे कामावर कसे जायचे असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे.

नेरळवरून पहाटेची ५.४० ची एकच लोकल मुंबईच्या दिशेने आली आहे. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर काही धिम्या गतीच्या लोकल जलद गतीने चालवल्या जात आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. लोकलसेवा उशिराने धावत आहेत. तर अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. बदलापूर ते कर्जत पर्यंतची लोकलसेवा ठप्प झाली आहे. लोकलसेवा पूर्वपदावर येण्यासाठी किती कालावधी लागणार याची माहिती समोर आली नाही.

दरम्यान, मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मी उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक २० मिनिटं उशिराने सुरू आहे. तर हार्बर मार्गावरील वाहतूक १५ मिनिटं उशिराने सुरू आहे.

तर, विरार ते चर्चगेट मार्गावरील पश्चिम रेल्वेची लोकलसेवा अद्यापही उशिराने सुरू आहे. लोकल अर्धा तास उशिराने धावत आहेत. वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे वेळापत्रक कोलमडले असून अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. याचा फटका मुंबईच्या दिशेने कामासाठी जाणाऱ्यांना बसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Waterfall : धो धो कोसळणारा धबधबा अन् सह्याद्रीच्या सौंदर्याचा सुंदर संगम, अहिल्यानगरमध्ये लपलंय 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: कणकवलीतील घोणसरीचा मनमोहक धबधबा झाला प्रवाहित

School Holiday: शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पालघर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Suraj Chavan : गुलाबी गाऊन अन् मोकळे केस; सूरज चव्हाणच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का? VIDEO व्हायरल

IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

SCROLL FOR NEXT