मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी
सीएसएमटी-कुर्ला ६आणि ७ लाइन प्रोजेक्ट कधी सुरु होणार?
१७ वर्षांपूर्वीचा प्रकल्प अजून का रखडला?
मुंबईत रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सर्वाधिक गर्दी ही मध्य रेल्वेला असते.त्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन आणि कुर्ला हे स्थानक नेहमी गर्दीने भरलेले असते. दरम्यान, या मार्गावर लाखो प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरील गर्दीकमी करण्यासाठी १७ वर्षांपूर्वी एक पाऊल उचलण्यात आले. १७ वर्षांपूर्वी सीएसएमटी आणि कुर्ला यादरम्यान, दोन रेल्वे मार्गांचे काम सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.
२०१० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आश्वासन दिले होते की, सीएसएमटी ते कुर्ला पाच आणि सहावी लाइन हा प्रकल्प २०१५ पर्यंत पूर्ण होईल. मात्र, त्यानंतरही आता १० वर्षे पूर्ण झाली आहे. अजून या प्रकल्पाचा पहिला टप्पादेखील पूर्ण झालेला नाही.
यामध्ये कुर्ला ते परळ आणि परळ ते सीएसएमटी असे दोन टप्पे आहेत.यामधील दुसरा टप्पा हा जागेच्या कमतरतेमुळे पुढे ढकण्यात आला आहे.
CSMT ते कुर्ला ५ आणि ६ लाइन प्रकल्प आहे तरी काय? (What is Kurla to CSMT 5th And 6th Line Project)
CSMT ते कुर्ला ५ आणि ६ लाइनच्या प्रकल्पाला २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. मुंबईतील सर्वात व्यवस्त स्थानकांपैकी दोन म्हणजे सीएसएमटी आणि कुर्ला हे गर्दीपासून मुक्त होतील. या मार्गावरुन जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस, मालगाड्या या नवीन रेल्वे लाइनवर वळवण्यात येणार होत्या. मात्र, याचे काम अद्याप रखडले आहे.
पहिला टप्पा-कुर्ला ते परळ (Kurla to Parel)
कुर्ला ते परळ हा मार्ग १०.१ किलोमीटरचा असणार आहे. मात्र, या मार्गात झोपडपट्टी पुनर्वसन, भूसंपादन अशा अनेक समस्यांमुळे काम पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत.
दुसरा टप्पा- परळ ते सीएसएमटी (Parel To CSMT)
परळ ते सीएसएमटी हा मार्गा ७.४ किलोमीटर लांब असणार आहे. याचे काम अद्याप सुरुदेखील झाले नाही. या भागात भूसंपादन, जमीन हस्तांतरण या गोष्टींमुळे अनेक अडचणी येत आहेत. मात्र, हे काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष काम सुरु होईल. काम रद्द केले जाणार नाही, असं एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाइनचा कसा फायदा होणार? (CSMT-Kurla 5th And 6th Line Project)
रेल्वेची पाचवी आणि सहावी रेल्वे लाइनवर फक्त एक्सप्रेस, मेल आण मालगाड्या धावणार आहेत. या मार्गावर इतर कोणत्याही लोकल धावणार नाही.मालगाड्यांसाठी वेगळा मार्ग दिल्यामुळे ३ आणि ४ लाइनवर फक्त लोकल ट्रेन धावणार आहेत. सध्या याच मार्गावर एक्सप्रेस, मालगाड्या धावत आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन अनेकदा उशिराने धावतात.यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळेच हा प्रकल्प मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.