
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे येत्या दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त ६० अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेनेही सणांच्या वेळी ३ विशेष गाड्यांची घोषणा केलीय. या विशेष गाड्या वांद्रे टर्मिनस-अयोध्या कॅन्ट, वांद्रे टर्मिनस-लुधियाना जंक्शन आणि उधना-जयनगर दरम्यान धावतील. या विशेष गाड्या सप्टेंबरच्या अखेरीस ते डिसेंबर २०२५ च्या सुरुवातीपर्यंत धावतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष (१२ सेवा)
01145 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ०६.१०.२०२५ ते १०.११.२०२५ पर्यंत प्रत्येक सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०५ वाजता सुटेल आणि आसनसोल येथे तिसऱ्या दिवशी ०५.३० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
01146 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ०८.१०.२०२५ ते १२.११.२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवारी आसनसोल येथून २१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी १६.२० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, पं. दीनदयाळ उपाध्याय, भाबुआ, सासाराम, देवरिया सदर, अनुराग नारायण रोड, गया, कोडरमा, हजारिबाग रोड, पारसनाथ, नेताजी सुभाषचंद्र बोस गोमो, धनबाद आणि कुलटी.
संरचना: २० वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे व २ जनरेटर डबे.
२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – करीमनगर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष (१२ सेवा)
01021 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ११.१०.२०२५ ते १५.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून ००.२० वाजता सुटेल आणि करीमनगर येथे त्याच दिवशी १६.०० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
01022 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ११.१०.२०२५ ते १५.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शनिवारी करीमनगर येथून १७.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे दुसऱ्या दिवशी १३.५० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, औरंगाबाद, जालना, पार्टुर, सेलू, परभणी, पुर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आर्मूर, मेटपल्ली आणि कोरटल.
संरचना: २० वातानुकूलित तृतीय श्रेणी व २ जनरेटर डबे.
३) लोकमान्य टिळक टर्मिनस – मुजफ्फरपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष (१२ सेवा)
01043 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ०७.१०.२०२५ ते ११.११.२०२५ पर्यंत प्रत्येक मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि मुजफ्फरपूर येथे तिसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
01044 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ०९.१०.२०२५ ते १३.११.२०२५ पर्यंत प्रत्येक गुरुवारी मुजफ्फरपूर येथून ०८.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे दुसऱ्या दिवशी २२.५० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी जं., फतेहपूर, सुभेदारगंज, मिर्झापूर, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर.
संरचना: १ वातानुकूलित प्रथम, ३ वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय, १ पेंट्रीकार व २ जनरेटर डबे.
४) पुणे – हजरत निजामुद्दीन – पुणे द्विसाप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित विशेष (२४ सेवा)
01493 द्विसाप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित विशेष गाडी ०६.१०.२०२५ ते १३.११.२०२५ पर्यंत प्रत्येक सोमवार व गुरुवारी पुणे येथून १७.३० वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)
01494 द्विसाप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित विशेष गाडी ०७.१०.२०२५ ते १४.११.२०२५ पर्यंत प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी हजरत निजामुद्दीन येथून २१.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा जं., गोध्रा (फक्त 01494 साठी), रतलाम, शामगढ, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, भरतपूर जं. आणि मथुरा.
संरचना: १६ वातानुकूलित तृतीय व २ जनरेटर डब्बे.
आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 01145, 01021, 01043 आणि 01493 यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले आहे.
अनारक्षित डब्यांची तिकिटे UTS द्वारे सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या नेहमीच्या दराने बुक करता येतील.
सविस्तर वेळापत्रक व थांबे जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.