Mumbai Local Train News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! १४ एप्रिल रोजी मध्यरात्री धावणार विशेष लोकल; कसे असेल वेळापत्रक? वाचा

Mumbai Local Train News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी मध्य रेल्वेकडून ४ विशेष उपनगरी गाड्या चालविण्यात येणार आहेत.

Alisha Khedekar

  • आंबेडकर जयंतीनिमित्त ४ विशेष लोकल

  • सीएसएमटी-कल्याण व हार्बर मार्गावर धावणार लोकल

  • मध्यरात्री ०१:३० वाजता गाड्या सुटणार

  • प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा निर्णय

  • नियमित सेवा पूर्ववत सुरू राहणार

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या १४ एप्रिल रोजी लोकलने प्रवास करणार असाल तर घराबाहेर पडण्याआधी हे वेळापत्रक नक्की वाचा. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मध्य रेल्वेद्वारे ४ विशेष उपनगरी गाड्या चालविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक अनुयायी प्रवास करतात त्यांची गैरसोय होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार व मंगळवार दिनांक १३ आणि १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री मध्य रेल्वेकडून ४ विशेष उपनगरी गाड्या चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल व कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल. तसेच कल्याण येथून ०१.३० वाजता लोकल सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता लोकल सुटेल व पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल. तसेच उपनगरी विशेष गाडी पनवेल येथून ०१.३० वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल.मंगळवारी म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी उपनगरी सेवा नेहमीप्रमाणे असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईत येतात. यावेळेस कोणत्याही प्रकारचा अनुचित घटना घडू नयेत, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानामुळे पशुपालक सापडले संकटात

उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला, राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार, नेमकं काय म्हणाले?

Famous Actress Divorce : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ५ वर्षांनी घटस्फोट, २ मुलांच्या आईच्या आयुष्यात वादळ

IPL सुरू असतानाच टीम इंडियासाठी आली बॅड न्यूज; इंग्लंड, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकांना २ खेळाडू मुकणार

SCROLL FOR NEXT