वंदे भारत एक्स्प्रेसला दोन नवीन थांबे जाहीर
२४ आणि २६ नोव्हेंबरपासून लागू
प्रवाशांची जुनी मागणी अखेर पूर्ण
रेल्वे प्रशासनाने प्रवासी सोयीसाठी निर्णय घेतला
वंदे भारत गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वेने प्रायोगिक तत्वाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे- हुबळी - पुणे वंदे भारत या गाड्यांना अनुक्रमे दौंड आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.
22225/22226 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा दौंड येथे राहील. गाडी क्रमांक 22225 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला २४.११.२०२५ पासून दौंड स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी दौंड येथे २०.१३ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसला २४.११.२०२५ पासून दौंड स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी दौंड येथे ०८.०८ वाजता पोहोचेल.
20670/20669 पुणे – हुबळी – पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा किर्लोस्करवाडी येथे राहील. गाडी क्रमांक 20670 पुणे – हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला २४.११.२०२५ पासून किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी किर्लोस्करवाडी येथे १७.४३ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 20669 हुबळी – पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला २६.११.२०२५ पासून किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी किर्लोस्करवाडी येथे ०९.३८ वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सोलापूर प्रवास करणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला तसेच पुणे रल्वे स्थानकातूनू हुबळीला प्रवास करणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला या अगोदर काही ठराविक रल्वे स्थानकावरच थांबा देण्यात यायचे परंतु रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाने प्रवाशांना सहज आणि सुलभपणे दौंड आणि किलोस्करवाडीकडे प्रवास करता येईल.
दौंड आणि किर्लोस्करवाडी येथील प्रवासी आता त्यांच्या स्थानकांवरूनच वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढू किंवा उतरू शकतील. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. उच्च वेग, सुरक्षेची उच्च मानके आणि आधुनिक प्रवास अनुभवामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सतत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी जागतिक दर्जाच्या, विश्वासार्ह आणि प्रवासी-मैत्रीपूर्ण सेवांचा पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.