Mumbai Railway  
मुंबई/पुणे

Mumbai Railway : एस्केलेटर देखभाल अधिक खर्चिक; मध्य रेल्वेला झालं इतक्या कोटींचं नुकसान

Mumbai Railway Latest News : मुंबई रेल्वे सेवेतील एस्केलेटर हे प्रवास सुविधेसाठी बसविण्यात आलं आहे. मात्र, या एस्केलेटरमध्ये नेहमीच बिघाड होत असतो. पश्चिम रेल्वे एका एस्केलेटरच्या देखभालीवर 1.85 लाख वर्षाला खर्च करते.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Railway News :

मुंबई रेल्वे सेवेतील एस्केलेटर हे प्रवास सुविधेसाठी बसविण्यात आलं आहे. मात्र, या एस्केलेटरमध्ये नेहमीच बिघाड होत असतो. पश्चिम रेल्वे एका एस्केलेटरच्या देखभालीवर 1.85 लाख वर्षाला खर्च करते. तर मध्य रेल्वे 2.97 लाख रुपये खर्च करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना रेल्वे प्रशासनाने दिली आहे. (Latest Marathi News)

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे एस्केलेटरबाबत विविध माहिती विचारली. 'चर्चगेट ते विरार या दरम्यान 106 एस्केलेटर आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्षं देखभाल खर्च हा 1.85 लाख आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता शकील अहमद यांनी दिली.

तर सीएसटीएम ते कल्याण आणि सीएसटीएम ते वाशी या दरम्यान 101 एस्केलेटर आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्षं देखभाल खर्च हा 2.97 लाख आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता एच एस सूद यांनी अनिल गलगली यांना कळवली.

1825 वेळा बंद पडते एस्केलेटर

बंद होणाऱ्या एस्केलेटरची माहिती देताना म्हटलं पश्चिम रेल्वेने सांगितलं की, एका वर्षात 1825 वेळा एस्केलेटर बंद पडते. 95 टक्के आपत्कालीन बटन अज्ञात व्यक्तीकडून बंद केल्याने एस्केलेटर बंद होते. तर मध्य रेल्वेच्या एच एस सूद यांनी बंद एस्केलेटरची माहिती नोंद न ठेवल्याची कबुली दिली. विशेष दिवशी बंद असलेल्या एस्केलेटर माहिती विचारली तर ती दिली जाऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबईतील 2 रेल्वे अंतर्गत एस्केलेटरबाबत खर्चातील 1.12 लाखांच्या तफावतीवर गलगली यांनी आश्चर्य व्यक्त केलं. यामुळे मध्य रेल्वेला वर्षाला 1.13 कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशीची मागणी करत संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सुविधासाठी बसविण्यात आलेले एस्केलेटर गर्दीच्या अधिकांश वेळी बंद असल्याने प्रवाशांना दुविधांचा सामना करावा लागतो, याबाबत नाराजगी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT