Pune-Nashik Expressway Saam TV
मुंबई/पुणे

Expressway Projects : ५ राज्ये आणि ५५ कोटी लोकांना होणार फायदा; केंद्र सरकार खूशखबर देण्याच्या तयारीत, महाराष्ट्रालाही होणार लाभ

Expressway Projects in india : ५ राज्य आणि ५५ कोटी लोकांच्या फायद्याची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार खूशखबर देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रालाही लाभ होणार आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : मोदी सरकार आणखी एक खूशखबरी देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारची कॅबिनेट आज शुक्रवारी होणार आहे. या कॅबिनेटमध्ये ५०,००० कोटी रुपयांचा आठ मोठ्या राज्यमार्ग विस्तार प्रस्तावाच्या मंजुरीचा विचार केला जाऊ शकतो. हे राज्यमार्ग उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील आहेत. या पाचही राज्यांची लोकसंख्या ५५ कोटी आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रस्तावात ६८ किलोमीटर लांब अयोध्या बायपास, १२१ किलोमीटर लांब गुवाहाटी रिंग रोड, ५१६ किलोमीटर खडकपूर-सिलीगुडी एक्स्प्रेसवे , ६ पदरी आगरा ग्वालियर ग्रीनपील्ड हायवे आणि नाशिक ते खेड आठ पदरी असणारा ३० किलोमीटर लांब एलिव्हेटेड हायवेचाही समावेश आहे. हे काम सार्जवजनिक खासगी भागिदारी (पीपीपी) तत्वावर करण्यात येणार आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामावर बोली लावण्यासाठी अनेकांना आमंत्रित केलं आहे. या कामाविषयी माहिती देण्यासाठी राज्यमार्गाच्या डेव्हलपर्ससोबत अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बोली लावण्याआधी कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागणार आहे. एका अधिकाऱ्याने म्हटलं की, 'काही जण पीपीपी तत्वावर काम करण्यास इच्छुक आहे. या कामासाठी अनेक चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. कॅबिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर डेव्हलपर्सना आमंत्रित करण्यासाठी आमंत्रित करणार आहे'.

दरम्यान, केंद्र सरकार कोणत्याही राज्यमार्ग विकास योजनेला व्यापक स्वरुपात मंजुरी देणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला १००० कोटींच्या कामासाठी मंजुरीसाठी कॅबिनेटची परवानगी आवश्यक असते. या कामाचा प्रस्ताव महामार्ग मंत्रालया डिसेंबरपर्यंत मंजुरीसाठी कॅबिनेटजवळ पाठवण्याची शक्यता आहे. तसेच या कामाची यादी पाठवण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी महामार्ग एजन्सींना कॅबिनेटची मंजुरी मिळताच ३ डी नोटिफिकेशनसाठी परवानगी दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT