CBI Raid On Sameer Wankhede
CBI Raid On Sameer Wankhede Saam TV
मुंबई/पुणे

CBI Raid On Sameer Wankhede: तब्बल 13 तासांनी CBI छापेमारी संपली; तपासात नेमकं काय घडलं?

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Sameer Wankhede: एनसीबीचे माजी अधिकारी आयएस ऑफिसर समीर वानखेडे यांच्या घरावरील छापेमारी तब्बल १३ तासानंतर संपली आहे. सीबीआयच्या दहा ते बारा अधिकाऱ्यांकडून ही छापेमारी काल सायंकाळी साडेचार वाजल्यापासून सुरू झाली होती. सकाळी साडेपाच वाजता सीबीआयची टीम घरातून रवाना झालीये. गोरेगाव येथील राहत्या घरी सीबीआयची छापेमारी सुरू होती. (Latest Crime News)

सीबीआय अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या घरातून प्रिंटर आणि काही कागदपत्रे जाताना सोबत घेऊन गेले आहेत. सुरुवातीला तीन अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू करण्यात आल्यानंतर तीन साडेतीन तासानंतर हे तीनही अधिकारी बाहेर पडले होते. नंतर पुन्हा ही छापीमारी सुरू झाली व पहाटे साडेपाच वाजेपर्यंत सर्च ऑपरेशन संपले आहे.

कोणत्या प्रकरणी छापेमारी करण्यात आली?

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता किंग खान अर्थातच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीकडून अंमली पदार्थांप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी आर्यनची सुटका व्हावी यासाठी वानखेडे यांनी कथित लाच मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

कॉड्रेलीया क्रूझवर आर्यन खान अंंमली पदार्थांप्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली आणि ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

वानखेडे यांच्या सहकार्याला केलं सेवेतून बडतर्फ

दरम्यान, आर्यन खान (Aaryan Khan) अंमली पदार्थांप्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. या अधिकाऱ्यानं आपल्या सहकाऱ्यांसह कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यामध्ये आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. पण सध्या त्यांच्यावर झालेली बडतर्फीची कारवाई दुसऱ्या प्रकरणात झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heena Gavit : खोटे बोलून आदिवासी समाजाची दिशाभूल; डॉ. हिना गावित यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Amaravati Water Crisis News | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

Narendra Modi: अमेठीत पराभव दिसला, राजपुत्र थेट रायबरेलीत पळाला; PM मोदींचा राहुल गांधींना टोला

Sanjay Raut: विश्वजित कदम वाघ आहेत की नाही, 4 जूनला कळेल : संजय राऊत, Video

Water Issue in India : चिंता वाढली; देशातील १५० जलाशयांमधील पाण्याच्या पातळीत मोठी घट, दक्षिणेतील धरणे अर्धे रिकामे

SCROLL FOR NEXT