Pune CBI Action Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात खळबळ! संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपनीवर CBI ची मोठी कारवाई; लाचखोरी अन् संवेदनशील माहिती उघड? बड्या अधिकाऱ्याला अटक

Pune CBI Big Action: पुण्यात सीबीआयने मोठी कारवाई केली. पुण्यात म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक करण्यात आली.

Akshay Badve
  • पुण्यात म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक

  • ५०० कोटी रुपयांच्या दारूगोळा पुरवठा कराराची सीबीआय चौकशी

  • एसएमपीपी कंपनीच्या सीईओला कथित लाचखोरी प्रकरणात अटक

  • संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती उघड केल्याच्या आरोपाची चौकशी

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील सरकारी कंपनी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे (MIL) कार्यकारी संचालक अनिल कुमार आणि दारूगोळा निर्मिती करणाऱ्या एसएमपीपी (SMPP) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशिष कंसल यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. ५०० कोटी रुपयांच्या दारूगोळा पुरवठा कराराशी संबंधित सरकारी कामांमध्ये कामं मिळवून देणे आणि संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती उघड केल्याचा आरोप केंद्रीय तपास यंत्रणेने केला आहे. या प्रकरणात अनिल कुमार यांचा भाऊ बी. हर्षवर्धनलाही अटक करण्यात आली आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या एफ आय आर नुसार, पुण्यातील येरवडा भागात असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले अनिल कुमार यांना अटक केल्यानंतर कोट्यवधी रुपयांची रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली असून काही कागदपत्र सुद्धा तपास यंत्रणेच्या हाती लागली आहेत.

अनिल कुमार यांनी काही खासगी कंत्राटदार आणि विक्रेत्यांच्या संगनमताने कथित लाच मागितली आणि स्वीकारली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, संरक्षण उत्पादन, खरेदी प्रक्रिया आणि सरकारी कंपनीच्या इतर धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या कामकाजासंदर्भातील संवेदनशील संरक्षणविषयक माहिती उघड केल्याचाही आरोप सीबीआयने केला आहे.

म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना अनिल कुमार यांनी काही खासगी कंत्राटदार आणि विक्रेत्यांच्या संगनमताने सरकारी कामांमध्ये अनुकूलता दाखविण्याच्या बदल्यात बेकायदेशीर आर्थिक लाभ मागितल्याचा आणि स्वीकारल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणाचा संबंध एसएमपीपी कंपनीला मिळालेल्या ५०० कोटी रुपयांच्या दारूगोळा पुरवठा कराराशी असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या कराराच्या अनुषंगाने लाचखोरी आणि संवेदनशील संरक्षणविषयक माहितीच्या कथित देवाणघेवाणीचा तपास सीबीआयकडून केला जात आहे.

500 कोटींच्या दारूगोळा कराराची चौकशी

या प्रकरणाची चकरं एसएमपीपी लिमिटेडला मिळालेल्या 500 कोटी रुपयांच्या दारूगोळा पुरवठा कराराशी जोडले गेले आहेत. या करारानुसार संबंधित कंपनीला 1 वर्षाच्या कालावधीत म्युनिशन्स इंडिया लिमिटेडला दारूगोळा पुरवठा करायचा होता. सी बी आय ने केलेल्या आरोपात, या कराराच्या अनुषंगाने एसएमपीपीचे अधिकारी आशीष कंसल हे अनिल कुमार यांच्या नियमित संपर्कात होते.

सरकारी कंपनीतील अधिकृत कामकाज, पुरवठा करार आणि संबंधित निर्णयप्रक्रियेदरम्यान खासगी कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्यात आला का, असा संशय तपास यंत्रणांना. या प्रक्रियेत आर्थिक मोबदल्याची मागणी करण्यात आली होती का, याचाही तपास सुरू आहे

अनिल कुमार यांच्या नातेवाईकांची सुद्धा होणार चौकशी

या संपूर्ण प्रकरणात प्रथम अनिल कुमार यांचे भाऊ यांना सी बी आय ने अटक केली आहे. कथित गैरव्यवहारातून मिळालेला पैसा लपविण्यासाठी अनिल कुमार यांनी पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाइकांच्या माध्यमातून रक्कम वळविल्याचा आरोप आहे. कथित रक्कम लपविण्यास आणि स्वतःकडे ठेवण्यास पत्नी व भावाने मदत केल्याचा संशय तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना आहे. संबंधित खात्यांमधील व्यवहार, पैशांचा स्रोत आणि रकमेचा वापर कुठे केला गेला याचा सखोल तपास सध्या सुरू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! ट्रक-दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; अख्ख कुटुंब संपलं

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार गुड न्यूज, महागाई भत्ता कितीने वाढणार?

Business Ideas For Women: महिलांसाठी कमी खर्चात होममेड ज्वेलरीचा बिझनेस; घरबसल्या व्हाल माला माल

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी; मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती

Ahilyanagar: नवरा-बायकोची आत्महत्या, खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT