Mumbai Crime News
Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : एटीएम मशीन सोबत छेडछाड करून कॅश चोरी; दोन जणांना अटक

Shivani Tichkule

संजय गडदे

ATM Cash Theft : मुंबईच्या बोरीवली पश्चिम भागातील बेसिंन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएम मशिन सोबत छेडछाड करून ग्राहकांचे पैसे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बोरिवली एम एच बी कॉलनी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना कळवा येथून ताब्यात घेतले आहे. धीरेंद्रकुमार रामदेव पाल ( 22 वर्ष) आणि अभिषेक रामअजोर यादव (22 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते दोघेही उत्तर प्रदेश प्रतापगड येथील राहणारे आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई (Mumbai) बोरिवली पश्चिमेकडील भगवती रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएम मशीन केंद्रात दोन अनोळखी तरुणांनी घुसून स्क्रू ड्रायव्हरने मशीनमध्ये छेडछाड केली. आणि एटीएम (ATM) रूमच्या बाहेर जाऊन थांबले काही वेळाने बँकेचा एक ग्राहक एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आला व त्याचे पैसे मशीन मधून न मिळाल्याने तो निघून गेला.

त्यानंतर बाहेर थांबलेले हे दोन इसम पुन्हा आत मध्ये येऊन एटीएम मशीनच्या कॅश विड्रॉलच्या ठिकाणी हात घालून त्यातील बेल्ट हाताने खेचून काढला आणि मशीनच्या आत मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पैसे आले की नाही याची खात्री केली व एटीएम मशीनचे नुकसान करून चोरी करण्याचा प्रयत्न करून पळून गेला. याबाबतची तक्रार बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक जॉय जोसेफ फरगोज यांनी एमएचबी पोलीस (Police) ठाण्यामध्ये दिली. पोलिसांनी 2 अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 379, 427, 511 भादवी नुसार गुन्हा दाखल केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार व पथक यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास करून आरोपींची ओळख पटवली व या दोन्ही आरोपींना पोलिसांनी कळवा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी डोंबिवली, नवी मुंबई ,मिरा रोड, नालासोपारा या ठिकाणी चोरी केलेल्याचे कबूल केले. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून एमएचबी पोलीस या आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

Special Report | ..तर पक्ष फुटला असता! शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT