Hadapsar, Dog, Police saam tv
मुंबई/पुणे

Pune : लिफ्टमधून खाली जात असताना कुत्रा चावला; मालकावर गुन्हा दाखल

कुत्र्यांना नीट ठेवणं ही मालकाची जबाबदारी असते. त्यामुळे अनेकदा अशा प्रकरणात मालकांवर गुन्हा दाखल केला जातो.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन जाधव

पुणे : पुणे (pune) शहरानजीकच्या हडपसर (Hadapsar) परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत एका महिलेस कुत्रा (dog) चावला. त्यामुळे संबंधित महिलेने त्याबाबत पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीनंतर हडपसर पाेलीसांनी ज्यांचा डाॅगी आहे त्या संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे संबंधित साेसायटीत कुत्र्यामुळं वाद निर्माण झाला आहे. (Pune Crime News)

या प्रकरणी राशी अभिषेक सक्सेना (rashi saxena) यांनी पाेलिसांत तक्रार केली हाेती. त्यानुसार मनीषा सिंग (Manisha Singh) यांच्या विरोधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० जुलैला संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा रोड परिसरातील कुमारसीयना या सोसायटीत घडली हाेती.

पाेलिसांत केली तक्रार

राशी सक्सेना या कामा निमित्त लिफ्टमधून खाली जात होत्या. त्यावेळी मनीषा सिंग यांच्या घरी असलेल्या पाळीव कुत्रा सक्सेना यांना चावला. यापुर्वी देखील सक्सेना यांनी कुत्र्याचा त्रास होत असल्याची तक्रार मालकाकडं केली हाेती. तसेच त्याला नीट ठेवा असं बजावलं हाेते. परंतु मालकाने काेणतीच उपयायाेजना केली नाही.

दरम्यान 20 जुलैला राशी संध्याकाळी कामानिमित्त लिफ्टमधून खाली उतरताना सात वाजताच्या सुमारास त्यांंना कुत्र्याने चावा घेतला. या सगळ्या प्रकाराला वैतागून त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मनीषा सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT