डेहराडून : उत्तराखंडच्या महिला व बाल कल्याण मंत्री रेखा आर्य (Rekha Arya) यांनी त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर 'जल अभिषेक' करताना सेल्फी काढण्याचे आदेश दिले. या आदेशाचे वृत्त वा-या सारखे पसरले आणि त्यातून वाद निर्माण झाला. राज्यातील स्त्री-पुरुष असमानता दूर करण्याचा संकल्प घेऊन येत्या 26 जुलै रोजी कावड यात्रा काढण्यात येणार असल्याचे रेखा आर्य (Uttarakhand Minister Rekha Arya) यांनी नमूद केले.
सेल्फी पाठवण्याच्या सूचना
उत्तराखंडच्या (Uttarakhand) महिला व बाल कल्याण मंत्री रेखा आर्य यांनी अधिकाऱ्यांना त्यांचे सेल्फी (selfie) विभागाच्या ईमेल आयडीवर पाठवण्याची सूचना केली आहे. यासोबतच त्यांना त्यांचे सेल्फीही त्यांच्या संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांसोबत व्हॉट्सअॅपवर शेअर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ योजने'ला (Save Girl)चालना देण्यासाठी ही याेजना आखली असून ही कृती निश्चित याेजना जनतेपर्यंत पाेहचविण्यास मदत करेल असेही नमूद केले आहे.
25 किलाे मीटर भव्य कावड यात्रा
रेखा आर्य यांनी हरिद्वार ते ऋषिकेश या २५ किलाे मीटरची भव्य कावड यात्रेचे आयाेजन केले आहे. ज्यामध्ये सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि इतर विभागातील स्वयंसेविका सहभागी हाेतील. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते ऋषिकेश येथील १३०० वर्षे जुन्या वीरभद्र मंदिरात भगवान शंकराला जलाभिषेक करून यात्रेचा समारोप होईल.
या २५ किलोमीटरच्या प्रवासात मी स्वत: शिवभक्त कानवडिया म्हणून सहभागी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आर्य यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत यात्रेदरम्यान "हरिद्वारमधील संत आणि आखाड्यांच्या प्रमुखांचे आशीर्वाद" घेणार आहे. यात्रेत सहभागी सर्व शिवभक्तांसोबत ऋषिकेश येथील भगवान शिव मंदिरात 2025 पर्यंत राज्याचे लिंग गुणोत्तर सुधारण्याची शपथ घेणार असल्याचे नमूद केले.
रेखा आर्य विरोधकांच्या निशाण्यावर
रेखा आर्य यांच्या सेल्फीच्या आदेशानंतर त्यांनी विरोधकांनी लक्ष केलं आहे. त्यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यवक्त हाेऊ लागली आहे. विराेधकांच्या तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धर्माशी निगडीत अशा सूचना देण्याऐवजी वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण आणि महिलांवरील अत्याचाराकडे लक्ष द्यावे, असा टाेला विरोधी पक्षनेत्यांनी लावला आहे. त्याचबरोबर अनेक सरकारी अधिकाऱ्यांनीही या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
वाद वाढल्याने दिलेले स्पष्टीकरण
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार वाद वाढल्यानंतर रेखा आर्य यांनी स्पष्टीकरण देत कपाळावर बंदूक लावली नसून निमंत्रण दिल्याचे म्हटले आहे. धर्मादाय कार्यक्रमाला यायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. कार्यक्रमात राहायचे की नाही, हे इच्छेवर अवलंबून असते. जेव्हा आपण एखाद्याला आमंत्रित करतो तेव्हा आपण ते त्याच्या इच्छेनुसार सोडतो. रेखा आर्य यांनी सांगितले की, धार्मिक कार्यक्रमासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.