Rida Rashid BJP Saam TV
मुंबई/पुणे

Rida Rashid BJP: भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रिदा रशीद यांच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल

A case has been registered against Rida Rashid: रिदा रशीद या 40 वर्षीय महिलेनं आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला होता.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

कल्पेश गोरडे, ठाणे

Jitendra Awhad Latest News: मुंब्राचे स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा रशीद या तथाकथित समाजसेविकेवर मुंब्रा पोलीस ठाण्यात आता पिटा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Rida Rashid Latest News)

रिदा रशीद या मुंब्रा (Mumbra) परिसरात समाजसेविका म्हणून वावरत आहे. त्यांच्याकडे घटस्फोटीत महिला नोकरीसाठी गेल्या असता त्यांना हॉटेलमध्ये गैरकृत्य करण्यास पाठविण्यात आल्याची तक्रार महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून तथाकथित समाजसेविका रिदा रशीद यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. १२०४ भादंवि ३७०(ए), पॉक्सो अंतर्गत कलम ४, १०, ६, आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडलग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र मुंब्रा पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. (Latest Marathi News)

रिदा रशीद आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला वाद

रविवारी, 13 नोव्हेबंर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिळफाटा येथे एका उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जात असताना आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विनयभंग केल्याची तक्रार रिदा रशीद यांनी केली होती. रिदा रशीद या 40 वर्षीय तक्रारदार महिलेनं आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला होता. त्यानंतर रिदा राशिद यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

पोलिसांनी त्यांना तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात रिदा राशिद यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून रिदा राशिद या चर्चेत आल्या होत्या. या आरोपानंतर आव्हाड हे आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार झाले होते. मात्र आता रिदा रशीद यांच्यावर वेश्या व्यवसास प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल झाल्याने आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT