संजय गडदे, साम टीव्ही मुंबई
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र वापरल्याचा ठपका ठेवत कोर्टाने भाजपचे नेते मुरजी पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबईच्या शाहूनगर पोलिसांनी मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भाजप नेते मुरजी पटेल यांनी २०१७ साली अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक ८१ मधून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. निवडणूक लढताना त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र वापरले असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. याविरोधात कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. (Latest Marathi News)
दरम्यान, मुरजी पडेल यांनी निवडणुकीत जातीचे बोगस प्रमाणपत्र वापरले कोर्टात सिद्ध झाले. इतकंच नाही तर, मुरजी पटेल यांनी निवडणूक अर्जासोबत जात प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला व जन्म प्रमाणपत्र दिले होते, ते देखील बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे.
त्यामुळे मुरजी पटेल यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना दिले. दरम्यान, कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईच्या शाहूनगर पोलिसांनी मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
मुरजी पटेल हे भाजपचे कट्टर नेते मानले जातात. २०१७ साली त्यांनी अंधेरीतून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्यामुळे ६ सहा वर्षांसाठी नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याविरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आक्षेप घेतल्याने हा अर्ज मागे घेण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.