NCP Hearing Supreme Court: 'तूतारी गटाला फार उकाळ्या फुटायला लागल्या', अमोल मिटकरी यांची शरद पवार गटावर टीका

Amol Mitkari News: सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटासंदर्भात महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय. यासंदर्भात राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी प्रतिक्रिया दिली आहे.
Amol Mitkari On Sharad Pawar Group
Amol Mitkari On Sharad Pawar GroupSaam Tv
Published On

>> अक्षय गवळी

Amol Mitkari On Sharad Pawar Group:

सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटासंदर्भात महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय. यासंदर्भात राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ''पक्ष आणि पक्ष चिन्ह भेटण्यापूर्वी जी याचिका दाखल झाली होती, त्यावरचा तो युक्तिवाद होता. आज वकिलांचा युक्तिवाद मीडियामध्ये दाखवला जातोय. सुप्रीम कोर्टाचे कुठलेही निर्देश नाहीये. आज तूतारी गटाला फार उकाळ्या फुटायला लागल्या. हे बिनबुडाचे आहेत.''

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने कुठलीही निर्देश दिले नाहीये, दोन वकिलांचा तो युक्तिवाद आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्ह हे अजितदादांच्याच नेतृत्वामध्ये असेल. त्यामुळ लोकांनी जास्त उड्या मारू नये. असेही मिटकरी म्हटले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amol Mitkari On Sharad Pawar Group
Petrol Diesel Price Drop: मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने केली मोठी कपात

विशेष म्हणजे पवार साहेबांनी अगोदर सांगितले फोटो वापरु नका, तेव्हा साहेबांचा आदेश कोर्टाप्रमाणेच होता. तेव्हापासूनच फोटो वापरणं बंद झालेये, असेही ते बोलले. शरद पवार गटाने अजितदादा गटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शरद पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्रांचा गैरवापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा हा आरोप होता.  (Latest Marathi News)

'शरद पवार हे खूप मोठ्या उंचीचे नेते'

दरम्यान, याच मुद्द्यावर बोलताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, ''सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी न्यायदान करण्याच्या आसनावर बसलेले असताना शरद पवार यांच्याबद्दल जी टीप्पणी केली आ,हे ती छाती फुगवणारी होती. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, शरद पवार हे खूप मोठ्या उंचीचे नेते आहेत. सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशाने न्यायासनवर बसून अशी टीप्पणी कोणाबद्दल केली असेल, असे मला तरी आठवत नाही.''

Amol Mitkari On Sharad Pawar Group
5 Central Government Schemes: केंद्र सरकारच्या या 5 योजना सामन्यांसाठी आहे खास, तुम्हीही घेऊ शकता लाभ

ते ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''सर्वोच्च न्यायालयाला जे कळले ते ज्या बालकांना हाताला धरून शरद पवार यांनी चालविले, त्यांना समजले नाही, हे दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टीप्पणीने माझे मात्र उर भरून आले.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com