गणेश नाईक । Ganesh Naik  SaamTvNews
मुंबई/पुणे

महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणेश नाईकांवर गुन्हा दाखल!

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सदर महिला व आमदार गणेश नाईक हे गेल्या २७ वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत व त्यांना एक मुलगाही आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई : महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी मंत्री व भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर बेलापूरच्या सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाईक यांनी २०२१ मध्ये आपल्यावर रिव्हॉल्व्हर (Revolver) रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या पीडित महिलेने केला होता. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून नाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ganesh Naik Latest News)

हे देखील पहा :

४७ वर्षीय पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सदर महिला व आमदार गणेश नाईक हे गेल्या २७ वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहत आहेत. या नात्यातून त्यांना एक मुलगा देखील झालेला आहे. या मुलाचा स्वीकार करण्यात यावा तसेच मुलास वडील म्हणून नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पीडितेने नाईक यांच्याकडे केली होती. मात्र, गणेश नाईक यांनी वडील म्हणून मुलास आपले नाव देण्यास विरोध करत २०२१ मध्ये सीबीडी बेलापूरमधील (CBD) त्यांच्या कार्यालयात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप या महिलेने केला आहे. यावरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधीही पीडितेने नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यानंतर या महिलेने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली होती. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पोलिसांना दिल्या होत्या. तसेच गणेश नाईक यांनी स्वत: पुढे येऊन डीएनए (DNA) चाचणी करावी व याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT