Maratha Reservation News | Carrot Agitation
Maratha Reservation News | Carrot Agitation Saam TV
मुंबई/पुणे

"मराठा आरक्षणाबाबत सरकारची मानसिकता उघड; उद्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर 'गाजर आंदोलन''

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : पोलिसांच्या विनंती वरून आम्ही कालच मुख्यमंत्र्यांना मागणीचे पत्र मेल केले आहे. पोलिस स्टेशनमध्ये बसूनच पाठवले आहे त्यामुळे आम्ही सांगितलेच नाही अशी बतावणी होऊ नये. उद्धवजी, आम्ही तुमच्याकडे 'मूक मोर्चा' ला 'मुका मोर्चा' म्हणून हिणवले ती आठवण करून द्यायला नाही (ते तर समाज कधीच विसरणार नाही) तर आश्वासनांचे काय झाले हे विचारण्यासाठी येतोय. भेकडासारखं रस्त्यात पोलिसांना अडवायला सांगू नका. आमचा आवाज दाबू नका तर आमचं म्हणणं ऐकून घेण्याची तयारी ठेवा अशा आशयाची फेसबुक पोस्ट (Facebook Post) मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांने लिहिली आहे. (Maratha Reservation News)

आझाद मैदान, आमरण उपोषण सुरू व्हायच्या दोन दिवस आधी मराठ्यांसाठी विशेष ओबीसी आयोग नेमला जाईल अशी घोषणा सरकार ने केली. ती पूर्ण करण्याचे सोडा, काहीच हालचाल नाही. मराठा समाजाला हे सगळ्यात मोठे गाजर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने दिले. वास्तविक पाहता त्या आयोगाच्या माध्यमातूनच आमच्या ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) रस्ता जातो.

त्याच आझाद मैदानावर दिलेली इतर छोटी मोठी आश्वासनं सुद्धा गाजरंच ठरली. तुम्ही नंतर काहीच केले नाही. छत्रपती संभाजी राजेंचे (Chhatrapati Sambhaji Raje) आमरण उपोषण देखील सरकारने गांभीर्याने घेतलं नाही. राजेंनी किरकोळ अपेक्षा सरकार कडून केली होती. ती सुद्धा पूर्ण न करणे हे मराठ्यांच्या प्रती सरकारची मानसिकता उघड करते. ती सरकार ला शेवटची संधी होती. आता लढा सामान्य क्रांतिकारक मराठे लढतील. तुमची पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो, जे बोलत नाही ते तर नक्कीच करतो.

मी सुद्धा आझाद मैदानावर राजेंच्या सोबत कट्टर उपोषण केले होते. त्यावेळी समाजच्या वतीने माझी एकच मागणी होती. की आझाद मैदानावर छत्रपतींचे वारस बसलेत. छत्रपती घराण्याच्या पुण्याई वर महाराष्ट्र चालतो. उपोषण सोडवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले पाहिजेत. ते काही फार मोठे साधू पुरुष आहेत म्हणून नाही, तर राज्याच्या प्रमुख पदाच्या खुर्चीत बसलेत म्हणून. नाहीतर कुणीच त्यांना बोलावलं नसतं. पण त्यांनी त्यावेळी स्वतःचा अहंकार दाखवला. ज्या पक्षाचं अस्तित्वच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे, छत्रपतींच्या भगव्या मुळे आहे. आम्ही मराठ्यांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने त्यांना केवळ वरील दोन गोष्टींमुळे मत देऊन राजकारणात जिवंत ठेवले. त्यांनी स्वतःला फार मोठं समजायची आवश्यकता नव्हती. मुख्यमंत्री पद आज आहे, म्हणून ते आयुष्यभर कायम राहील असा गैरसमज काढून टाका.

समाज हा निरंतर आहे. मराठा समाज हा हजारो वर्षांपासून आहे. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, सर्वात जास्त त्याग केलेला समाज आहे. या समाजाने सर्वांचा सांभाळ केला. त्या मराठा समाजाला आज हात पसरण्याची वेळ आली. पण सरकार आमच्या भावना गांभीर्याने घेत नाही असे दिसते. आम्ही सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना जागा दाखवून देऊ. उद्धव जी, समाज तुम्ही बसलेल्या खुर्चीशी भांडण करतोय. तिलाच मागणी करतोय. तुम्हाला वैयक्तिक काही बोल लावावे अशी आमचीही इच्छा नाही. फक्त आता, आश्वासन बंद करा, थेट निर्णय घेत चला असी पोस्ट मराठा मोर्चातील एका कार्यकर्त्यांने लिहली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Today's Marathi News Live : इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना भर सभेत शरद पवारांनी दम भरला

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

PBKS vs CSK: पंजाबच्या शानदार गोलंदाजीवर जडेजाचा पलटवार! जिंकण्यासाठी ठेवलं १६८ धावांचं आव्हान

Mouni Roy : दिवसाला तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अभिनेत्री 'या' आजाराने होती त्रस्त

SCROLL FOR NEXT