Carnac Bridge Demolition Saam TV
मुंबई/पुणे

Carnac Bridge Demolition: १५० वर्ष जुना कर्नाक ओव्हर ब्रिजच्या पाडकामाला सुरूवात; पुण्याहून मुंबईसाठी ४० जादा बसेस

Mumbai Latest News: सोमवारी पहाटे रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव, पुणे

Carnac Bridge Demolition: १५० वर्ष जुना असलेला मुंबईतील ब्रिटीशकालीन कर्नाक ओव्हर ब्रिज हटवण्याचे काम मध्य रेल्वेने (Central Railway) सुरू केले आहे. शनिवारी रात्री ११ वाजता हा ब्रिज हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यामुळे एसटी महामंडळाकडून आज, रविवारी पुण्याहून मुंबईकडे येण्यासाठी ४० ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. (Mumbai Latest News)

आज, २० नोव्हेंबरला मस्जिद बंदर स्थानकाजवळील सुमारे १५० वर्ष जुना असलेला कर्नाक ओव्हर ब्रिज हटवण्याचे काम मध्य रेल्वेने (Central Railway) सुरू केले आहे. यासाठी २७ तासांच्या मेगा पॉवर ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वे वरील भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते सीएसएमटी दरम्यान रेल्वे वाहतूक ही संपूर्ण बंद असणार आहे.

तसेच या दोन दिवसातील तब्बल ३६ लांब पल्याचा गाड्या आणि जवळपास ११०० लोकल गाड्यांच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सोमवारी पहाटे रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.

ब्लॉक कालावधी

अप आणि डाउन धिम्या मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ठिकाणी तब्बल १७ तासांचा ब्लॉक असणार आहे.

अप आणि डाउन जलद मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ठिकाणी तब्बल १७ तासांचा ब्लॉक असणार आहे.

अप आणि डाउन हार्बर मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजीच्या रात्री ८ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ठिकाणी तब्बल २१ तासांचा ब्लॉक असणार आहे.

पुण्याहून मुंबईसाठी आज एसटीच्या ४० जादा बसेस

दरम्यान, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे आज बंद आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याहून मुंबईला येण्यासाठी आज, रविवारी एसटीच्या ४० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील 36 रेल्वे आज रद्द करण्यात आल्या आहेत, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या 40 बसेस सज्ज आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

SCROLL FOR NEXT