Virar : संतापजनक! तरुणीची हत्या करून मृतदेहावर अत्याचार; आरोपी अटकेत

हत्या आणि बलात्कार प्रकरणातून फरार झालेल्या मृत तरुणीच्या आईच्या प्रियकराला शक्रवारी विरार पोलिसांनी अटक केली.
Crime News
Crime Newssaam tv
Published On

Virar Crime News : मागील आठवड्यातील शनिवारी चेन्नई येथे एका १८ वर्षीय तरुणाची हत्या करून तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेतील फरार झालेल्या मृत तरुणीच्या आईच्या प्रियकराला शक्रवारी विरार पोलिसांनी अटक केली. त्यानंतर चेन्नई पोलिसांच्या ताब्यात दिले. (Latest Marathi News)

Crime News
डीजे पार्टीनंतर भयंकर घडलं; धावत्या कारमध्ये १९ वर्षीय मॉडेलवर सामूहिक अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा विरार फुलपाडा परीसरात राहत असून बिगारी काम करत होता. राजू मणी नायर असे आपोरीचे नाव असून तो चेन्नईतून हत्या करून विरारला पळून आला होता. त्यानंतर शक्रवारी विरार पोलिसांनी अटक केली. त्यानंतर चेन्नई पोलिसांच्या ताब्यात दिले.

काय आहे प्रकरण ?

चेन्नईतील पूनमल्ली परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे आपल्या पतीशी संबध खराब झाल्याने प्रियकर राजू मणी नायर याच्याकडे रहायला आली होती. आरोपी राजू मणी नायर याने आपल्या मुलीचा सांभाळ करणार असल्याची कबूली दिल्याने ती त्याच्याकडे राहायला आली होती. पण आरोपी राजू याने १२ नोव्हेंबर रोजी तरूणीची आई घरी नसताना तिची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या मृतदेहावर बलात्कार केला.

जेव्हा मुलीची आई घरी आली, तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावले होते. तिने चावीने दरवाजा उघडला आणि तीची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या मानेभोवती खुणा होत्या आणि ती श्वास घेत नव्हती. नंतर जेव्हा आईने शेजाऱ्यांना विचारले असता, शेजाऱ्यांनी सांगितले की राजू दार लावून घाईघाईने निघून गेला.

Crime News
Shraddha Walker case : श्रद्धा वालकर प्रकरणात नवा ट्विस्ट; आफताबने बदलले स्टेटमेंट; ३५ नाही तर...

पूनमल्ली पोलीस (कायदा आणि सुव्यवस्था) चे निरीक्षक पीआर चिदंबरमुरुगेसन यांनी सांगितले, "फॉरेन्सिक टीमने मला तोंडी सांगितले की मारेकऱ्याने मुलीच्या शरीराशी शारीरिक संबंध ठेवले होते. या खुलाशानंतर, पोलिसांनी यापूर्वी नोंदलेल्या गुन्ह्यामध्ये बलात्काराचे आरोप जोडले, त्यानंतर त्यांनी विरार पोलिसांना आरोपीची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चेन्नई पोलिसांना आरोपींना पकडण्यात मदत केली.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, गुन्हा केल्यानंतर नायर हा विरार येथे पत्नीकडे आला होता. पळून जाताना त्याने मयताचे आणि तिच्या आईचे मोबाईल घेतले होते. त्याने आपला फोन बंद ठेवला होता, तरी त्याने चोरीला गेलेला एक फोन चालू केला होता त्यावरून आरोपी विरारला असल्याचे समजले आणि त्याला अटक केल्याची माहीती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com