Mumbai local : मुंबईत रविवारी २७ तासांचा मेगा पॉवर ब्लॉक; जाणून घ्या पर्यायी मार्ग

रविवारी मध्य रेल्वेवरील तब्बल २७ तासांचा मेगा पॉवर ब्लॉक असणार आहे.
mumbai mega block
mumbai mega block Saam Tv News

भूषण शिंदे

Mumbai Mega Block News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच रविवारी मुंबईकरांना जर एखादे महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. कारण उद्या, रविवारी मध्य रेल्वेवरील तब्बल २७ तासांचा मेगा पॉवर ब्लॉक असणार आहे. (Latest Marathi News)

mumbai mega block
Men's Day Special : 'मेन्स डे' निमित्त नेमक्या काय आहेत पुरुषांच्या मनातील गोष्टी ; पाहा व्हिडीओ

रविवारी म्हणजे उद्या २० नोव्हेंबर रोजी मस्जिद बंदर स्थानकाजवळील साधारण १५० वर्ष जुना असलेला कर्नाक ओव्हर ब्रिज हटवण्याचे काम मध्य रेल्वे (Central Railway) करणार आहे. आज रात्री ११ वाजता हा ब्रिज हटवण्याचे काम सुरु होईल. सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत हे ब्रिज हटवण्याचे काम पूर्ण होईल.

२७ तासांच्या मेगा पॉवर ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वे वरील भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते सीएसएमटी दरम्यान रेल्वे वाहतूक ही संपूर्ण बंद असणार आहे. तसेच या दोन दिवसातील तब्बल ३६ लांब पल्याचा गाड्या आणि जवळपास ११०० लोकल गाड्यांच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सोमवारी पहाटे रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा मध्य रेल्वे ने व्यक्त केली आहे.

mumbai mega block
शिवसेना ठाकरे गटाचं जनसंपर्क कार्यालय महापालिकेकडून जमीनदोस्त; संतप्त कार्यकर्ते रस्त्यावर, सुडापोडी कारवाई केल्याचा आरोप

ब्लॉक कालावधी

अप आणि डाउन धिम्या मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ठिकाणी तब्बल १७ तासांचा ब्लॉक असणार आहे.

अप आणि डाउन जलद मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ठिकाणी तब्बल १७ तासांचा ब्लॉक असणार आहे.

अप आणि डाउन हार्बर मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजीच्या रात्री ८ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ठिकाणी तब्बल २१ तासांचा ब्लॉक असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com