शिवसेना ठाकरे गटाचं जनसंपर्क कार्यालय महापालिकेकडून जमीनदोस्त; संतप्त कार्यकर्ते रस्त्यावर, सुडापोडी कारवाई केल्याचा आरोप

शिंदे गटात या अन्यथा तुमच्या कार्यालय तोडू असे आम्हाला सांगण्यात येत आहे.
Shivsena
Shivsena Saam TV

>> प्रदीप भणगे

कल्याण : कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जनसंपर्क कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले आहे. कार्यालय पाडल्याने शिवसैनिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. कल्याण पूर्वेच्या काटेमानेवली पुणे लिंक रोड परिसरात हे जनसंपर्क कार्यालय होते.

याठिकाणी पाच गाळे आणि संपर्क कार्यालय होते. यावर कल्याण डोबिंवली महापालिकेने बुलडोझर चालवत पाडकाम केलं. शिंदे गटात या अन्यथा तुमच्या कार्यालय तोडू असे आम्हाला सांगण्यात येत आहे. हे कार्यालय राजकीय आकसापोटी पाडले असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. याबाबत आम्ही महापालिका प्रशासनाचा त्यांनी निषेध केला.  (Latest Marathi News)

Shivsena
Anil Parab : अनिल परब यांना मोठा दिलासा; दापोली रिसॉर्ट प्रकरणी अटकपूर्व जामीन

यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मालकी हक्काच्या जागेवर असलेले बांधकाम कोणताही मोबदला न दिल्याने महापालिकेने कारवाई केली हे राजकीय सुडापोटी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. तसेच सरकार आम्हाला घाबरत असल्याने महापालिकेला पुढे करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.

Shivsena
MNS News: कोश्यारी नावाचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवा, शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे आक्रमक

महापालिकेच्या आरक्षित जागेवर जवळपास 150-200 घरे आहेत. मात्र त्यासाठी त्यानी पूनर्वसन केले पाहिजे होतं. मात्र ठाकरे गटाचे कार्यालय असल्याने ही कारवाई केली गेली. मात्र कितीही दडपशाही केली तर आम्ही डगमगणार नाही. आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असं कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील यांनी म्हटलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com