divorce cases increased in pune  Saam tv
मुंबई/पुणे

न भूतो न भविष्यती! बायकोने दिली नवऱ्याला पोटगी अन् झाला घटस्फोट; पुण्यातील त्या कपलची गोष्ट ऐकून थक्क व्हाल

Special Marriage Act divorce rule : पुण्यातील एका अनोख्या घटस्फोट प्रकरणात पत्नीनेच पतीला ५० हजार रुपये देत समझोता केला. या घटनेमुळे पोटगी कायद्यावर आणि लिंगनिरपेक्ष देखभाल हक्कांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Akshay Badve

Pune family court latest news : घटस्फोटानंतर पती आपल्या पत्नीला पोटगी (Alimony) देतो, हे आतापर्यंत आपण चित्रपटात किंवा खऱ्या आयुष्यातही पाहिलं आहे. अनेकदा ही रक्कम किती असावी यावरून कोर्टात वर्षानुवर्षे खटले चालतात. पण पुण्यात चक्क 'उफराटी गंगा' पाहायला मिळाली आहे. येथे घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चक्क पत्नीनेच पतीला पोटगीची रक्कम दिली. ऐकून काहीसे विचित्र वाटेल. पण असं प्रत्यक्षात झालेय, ते पण पुण्यात. या प्रकरणाची पुण्यात आणि कायद्याच्या वर्तुळात खळबळ उडाली. नेमकी ही प्यार की अजब गजब कहाणी आहे तरी काय पाहूयात..

राजा आणि राणी (नावे बदललेली) एकाच गल्लीत राहात असल्याने दोघे प्रेमात पडले अन् दोघांनी पळून जाऊन १९ एप्रिल २०२४ ला कोर्ट मॅरेज केलं. त्यांनतर दोघेही पुण्यात असलेल्या आपापल्या घरी राहू लागले. विशेष विवाह कायद्यानुसार प्रेमविवाह केलेल्या जोडप्यामधील तरुणी घरच्यांच्या दबावाला बळी पडली आणि तिने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. मात्र, राज तिला नांदवायला तयार होता. तिला नांदायचे नव्हते. अखेर राणी ने त्याला कारण नसताना कोर्टात खेचल्याने तिनेच त्याला ५० हजार रुपये खटल्याचा खर्च द्यायचा, अशी अट टाकली आणि तिने रक्कम देण्याचे मान्य केल्याने दोघांचा घटस्फोट मंजूर झाला.

अगदी "साथिया" चित्रपटासारखेच हे कथानक, दोघांनाही एकत्रित राहण्याचे धाडस झाले नाही. मुलीने लग्न केल्याचे आईला सांगितले. त्यांच्या लग्नाला विरोध झाला. राणी माहेरच्या विरोधाला तोंड देऊ शकली नाही. जात वेगळी असल्याने तिच्या आईने तरुणीला भडकविले आणि तरुणीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली. तरुणाला नोटीस मिळाली. तरुण तिला नांदावायला तयार होता, पण तिलाच जायचे नव्हते. त्याने न्यायालयातील दोन्ही तारखांना येणे टाळले. त्यांनतर तरुणाने त्याच्या वकिलांच्या यांच्यामार्फत न्यायालयात वकीलपत्र दाखल केले. घटस्फोटापूर्वी जोडप्याचे समुपदेशन केले जाते पण या प्रकरणात या गोष्टीचा फायदा झाला नाही आणि अखेर एक रक्कम ठरवून पत्नी ने पतीला पोटगी द्यायचं ठरवलं आणि विषय संपला.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात घटस्फोटाचे प्रमाण सातत्याने वाढतंय. पुण्याच्या शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालय येथे दररोज सरासरी 10 हून अधिक नवीन घटस्फोट अर्ज दाखल होत असून वर्षाकाठी चार हजारांपेक्षा अधिक प्रकरणांची नोंद होतेय. पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढते अनुकरण, आर्थिक अस्थिरता, विभक्त कुटुंबपद्धतीकडे वाढलेला कल, एकमेकांना पुरेसा वेळ न देणे आणि वेगवान जीवनशैली यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतोय. कौटुंबिक न्यायालयाचा उद्देश केवळ घटस्फोट देणे नसून, शक्य तितक्या जोडप्यांना पुन्हा एकत्र आणणे सुद्धा आहे पण अशा नात्यांसमोर पैसे आणि पॉवर जिंकते असं दुर्दैवाने म्हणावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळेगाव दाभाडे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त

गोरेगाव ड्रग रॅकेटचा पर्दाफाश! सत्तूच्या ड्रग साम्राज्यावर पालिकेचा बुलडोझर|VIDEO

Summer Saree Collection : ऑफिस असो वा पार्टी, उन्हाळ्यात दिसा कूल अन् स्टायलिश; एकदा 'या' ५ सुंदर साड्या ट्राय कराच

Heat Wave: नागरिकांनो सावधान! विदर्भात 8 दिवस उष्ण लाटेचा इशारा; तापमानाचा पारा 45-46 अंशावर जाण्याची शक्यता

Maharashtra Heatwave: सूर्य कोपला; तुमच्या जिल्ह्याचं तापमान किती?

SCROLL FOR NEXT