Bulli Bai Appनंतर हिंदू महिलांविरूद्ध आक्षेपार्ह मजकूर; मंत्रालयाने घेतली दखल Saam TV
मुंबई/पुणे

Bulli Bai Appनंतर हिंदू महिलांविरूद्ध आक्षेपार्ह मजकूर; मंत्रालयाने घेतली दखल

चॅनेल ब्लॉक करण्याची कारवाई मागणी होत होती तेव्हा हे चॅनेल ब्लॉक करण्यात आलं आहे.

सुरज सावंत

मुंबई : बुली-बाई अॅप (Bulli Bai App) प्रकरणात मुस्लिम महिलांना लक्ष केले गेल्याचे वृत्त ताजे असतानाच, सोशल मिडियावर आता हिंदु समुदायातील महिलांविरूद्ध आक्षेपार्ह मजकूर असणारे ग्रुप टेलिग्रामवर बनवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल केंद्रीय मंत्रालयाने घेतली आहे.

बुली बाई अॅप प्रकरणात मुस्लिम समुदयातील महिलांना लक्ष केल्यानंतर काही समाज कंटकांनी हिंदू महिलांचे (Hindu Women) अश्लील फोटो टेलिग्रामवर (Telegram) ग्रुप बनवून शेअर केले जात आहेत. ट्विटरवरुन या टेलिग्राम चॅनेलसंदर्भातही अनेकांनी तक्रार केली. याच तक्रारीची दखल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतली असून त्यानंतरच हे चॅनेल ब्लॉक करण्याची कारवाई करण्यात आली असून त्यानंतरच हे चॅनेल ब्लॉक करण्यात आलं आहे.

तर बुली बाईनंतर अन्य कुठल्याही समुदायातील व्यक्ती किंवा महिलांबाबत अशा प्रकारे कृत्य होत असेल. तर ते संबधित व्यक्तिंनी मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दयावे. त्याची मुंबई पोलिस चौकशी करतील, तसेच वेळ पडल्यास गुन्हा नोंदवून तपासही केला जाईल. अशी माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Shraddha Kapoor Photos : चुराके दिल मेरा गोरिया चली, श्रद्धा कपूरचं मनमोहक सौंदर्य

मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंच्या कारवर भीषण हल्ला, ओबीसी मेळाव्याला जात असताना काचा फोडल्या

Laxman Hake : अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या कारवर हल्ला, मनोज जरांगे म्हणाले...

Beed Rain : बीडमध्ये मुसळधार पाऊस, पोलिस स्टेशनमध्ये साचले गुडघाभर पाणी |VIDEO

SCROLL FOR NEXT