Railway Stations Name Change  Saam TV
मुंबई/पुणे

Railway Stations Name Change : मुंबईतील ८ रेल्वे स्टेशनची नावे बदलणार? शिवसेनेच्या खासदाराचं CM एकनाथ शिंदेंना पत्र

British-Era Railway Stations Name Change : करी रोड (लालबाग), सॅन्डहर्स्ट रोड (डोंगरी), मरीन लाईन्स (मुंबादेवी), चर्नी रोड (गिरगांव) अशा एकूण ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Mumbai Railway Stations Name Change :

भारतावर ब्रिटीशांनी राज्य केलं तेव्हा त्यांच्यानुसार सर्व कारभार चालत होता. ब्रिटीशांनी त्यांच्या काळात मुंबईतील अनेक स्थानकांना नावे दिली होती. आता ब्रिटीश भारतात नाहीत, भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७७ वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र अद्यापही त्यांनी रेल्वे स्थानकांना दिलेली नावे तशीच आहेत. ही नावे आता लवकरच बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके ब्रिटीश कालीन नावाने ओळखली जातात. त्यामुळे सदर स्थानकांची नावे स्थानिक इतिहास पहाता नामांतरीत करणे महत्वाचे आहे. त्यामुळे मी आपणास मुंबईतील स्थानकांचे नामांतरण करण्याची सूची पत्रात नमुद करत आहे. तरी आपणास विनंती आहे की, पत्रातील नमुद स्थानकांची नावे बदलण्याकरीता आपण तातडीने संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, असे शेवाळे यांनी पत्रात लिहिले आहे.

सध्या असलेली रेल्वेस्थानकांची नावे, रेल्वे स्थानकांचे प्रस्तावित नावे

१. करी रोड (लालबाग)

२. सॅन्डहर्स्ट रोड (डोंगरी)

३. मरीन लाईन्स (मुंबादेवी)

४. चर्नी रोड (गिरगांव)

५. कॉटन ग्रिन (काळाचौकी)

६. डॉकयार्ड (माझगांव)

७. किंग्ज सर्कल (तिर्थकर पार्श्वनाथ)

8. मुंबई सेंट्रल (नाना जगन्नाथ शंकर शेट)

याआधी देखील रेल्वे स्थानकांची ब्रिटीश कालीन नावे बदलण्यात आली आहे. एल्फिस्टन या ब्रिटीश कालीन स्थानकाचे नाव आता प्रभादेवी करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket : अष्टपैलू खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सामन्यादरम्यान झाले वडिलांचे निधन; VIDEO

Maharashtra Live News Update: वंजारी समाजाला एसटीमधून आरक्षण द्यावे यासाठी पुण्यात वंजारी समाज आक्रमक

iPhone 17 Sale: iPhone 17 ची क्रेझ! मध्यरात्रीपासूनच मुंबईच्या Apple स्टोअरबाहेर लांबच लांब रांगा, VIDEO व्हायरल

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी अशी करा लक्ष्मीची पुजा; पैशांनी भरून जाईल संपूर्ण तिजोरी

Maharashtra Rain Update : नवरात्रीत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा |VIDEO

SCROLL FOR NEXT