१५ जानेवारी २०२६ रोजी २९ महापालिका निवडणुका
संभाजीनगरमध्ये २ मृत शिक्षकांना निवडणूक ड्युटी लावली
मृत शिक्षकांना प्रशिक्षण नोटीस दिल्याने नातेवाईकांमध्ये संताप
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित
माधव सावरगावे, संभाजीनगर
राज्यात येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी २९ महापालिकांसाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. तर आज २ जानेवारी २०२६ ला उमेदवारांना माघार घेता येणार आहे. या महापालिकेच्या निवडणुकीच्या कामांसाठी शिक्षकांची निवड केली जाते. त्यांना यादरम्यान इलेक्शन ड्युटी लावली जाते. मात्र संभाजीनगरमध्ये २ मृत शिक्षकांना चक्क इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर अधिकारीपदाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. शिवाय प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस बजावत कारवाईचा इशाराही दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील शिक्षक संभाजी कर्डिले यांचे ३ महिन्यांपूर्वी, तर शिक्षक राजेश बसवे यांचे १३ महिन्यांपूर्वी निधन झाले. असे असतानाही त्यांना निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानंतर चुकीची उपरती न झालेल्या प्रशासनाने आता या मृत शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावत हलगर्जीपणाचा कळस गाठला. यामुळे नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आम्ही सगळे कागदपत्र सादर करूनही इलेक्शन ड्युटी लावली आहे.
आमची माणसं हयात नसतानाही आमच्या भावना दुखावल्या जात असल्याचं मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दरम्यान सुरुवातीला मतदार याद्यांमध्ये मृत व्यक्तींची नावे आढळली होती, मात्र आता मृत व्यक्तींच्या नावे इलेक्शन ड्युटी लावल्याने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.