Breaking : मुंबईत ११ वर्षीय मुलीवर वॉचमन कडून अत्याचार! Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking : मुंबईत ११ वर्षीय मुलीवर वॉचमन कडून अत्याचार!

राज्यात महिला अत्याचाराच्या शृंखलेत खंड पडला नसल्याचेच हे द्योतक आहे हेच यावरून स्पष्ट झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या दोन घटना तसेच, मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आता एका 11 वर्षीय चिमुकल्या मुलीवर सोसायटीच्या वॉचमनने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या शृंखलेत खंड पडला नसल्याचेच हे द्योतक असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. कांजुरमार्गमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे देखील पहा :

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट ओसरली नसतानाच, काहीच दिवसांत हा प्रकार घडला आहे. सोसायटीची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर असते अश्या वॉचमननेच मुलीवर अत्याचार केल्याने त्यात अधिक भर पडली आहे. कांजुरमार्गमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपी वॉचमनला रात्री अटक केली आहे. या वॉचमनविरोधात पोलिसांनी आयपीसी 354 आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

साकीनाका प्रकरणावरून राज्यात महिला अत्याचाराची तीव्रता दिसून आली. त्यातच आता या अल्पवयीन मुलीवर रहिवाश्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या वॉचमनकडून अत्याचार करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT