Politics : पंजाब प्रदेश काँग्रेस मध्ये गटबाजी; ४० आमदार नाराज!

चंदीगडच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अमरिंदर सिंग यांचे भवितव्य अवलंबून आहे. ११७ सदस्यांच्या पंजाब विधानसभेत काँग्रेसचे ८० आमदार आहेत.
Politics : पंजाब प्रदेश काँग्रेस मध्ये गटबाजी; ४० आमदार नाराज!
Politics : पंजाब प्रदेश काँग्रेस मध्ये गटबाजी; ४० आमदार नाराज!SaamTvNews
Published On

पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील गटबाजी अनेक प्रसंगातून, जाहीर कार्यक्रमातून दिसून आली आहे. अनेकदा पंजाब काँग्रेसमधील या प्रकारचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही.

हे देखील पहा :

त्यातच आता पंजाब काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली असून काँग्रेसचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर काँग्रेसचे तब्बल ४० आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच अनुषंगाने आज पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची चंदिगढ मध्ये बैठक होणार असून या बैठकीत काय होणार हे महत्वपूर्ण असणार आहे.

सध्या मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. काँग्रेस नेतृत्वाच्या सूचनेनुसार, पंजाबच्या सर्व  काँग्रेस आमदारांची बैठक पंजाब प्रदेश काँग्रेस कार्यालयात चंदिगढ येथे आज संध्याकाळी ५ वाजता बोलावण्यात आली आहे. पंजाब काँग्रेसच्या ४० नाराज आमदारांनी हायकमांडला पत्र लिहून, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वावर  अविश्वास व्यक्त केला आहे.

Politics : पंजाब प्रदेश काँग्रेस मध्ये गटबाजी; ४० आमदार नाराज!
महाराष्ट्र ATS आणि Mumbai पोलिसांची कारवाई; संशयित दहशतवादी ताब्यात!

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील  गटबाजी नवी नाही. मात्र, आता हा वाद दिल्लीत पोहचला आहे. आता चंदीगडच्या विधिमंडळ  पक्षाच्या बैठकीत अमरिंदर सिंग यांचे भवितव्य अवलंबून आहे. ११७ सदस्यांच्या पंजाब विधानसभेत काँग्रेसचे ८० आमदार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com