Pune: बीआरटी बस स्टॉपला कार धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: बीआरटी बस स्टॉपला कार धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

नगर रस्त्यावर खराडी चौकामध्ये बीआरटी बसथांब्याला ४ चाकी धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये २ तरुणांचा जागीच मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : नगर रस्त्यावर खराडी चौकामध्ये बीआरटी बसथांब्याला ४ चाकी धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये (accident) २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर २ तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. या भीषण अपघातामध्ये संकेत भुजबळ (वय- 22) रा. साईनगरी, चंदननगर) व त्याच्या शेजारी बसलेला ओम राहुल पवळे (वय-17), रा. किनारा सोसायटी कसबा पेठ या दोघांचा उपचाराअगोदरच मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

कारमध्ये (car) मागे बसलेले गौरव साठे (वय- 22) संभाजीनगर, वाघोली प्रफुल अंकमनची (वय- 21) रा. बिडी कामगार वसाहत, चंदनगर असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास नगर (Nagar) रस्त्यावरील बीआरटी (BRT) मार्गामध्ये पुण्याकडून नगरच्या दिशेने येणाऱ्या कारने मद्यधुंद चालकामुळे भरधाव वेगात येऊन बीआरटी बसथांब्याला जोरदार धडक दिली आहे. (Both died when a drunken car hit the BRT bus stop)

ही धडक एवढी गंभीर होती की कार बीआरटी बस स्टॉपच्या मध्यभागी असणाऱ्या जागेत जाऊन अडकली आहे. या अपघातामध्ये चालक संकेत भुजबळ आणि त्याच्या शेजारी बसलेला राहुल पवळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मागे बसलेले गौरव साठे, प्रफुल अंकमंची हे दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

जखमी युवकांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये अपघात करून मृत्यूस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जोगन करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

SCROLL FOR NEXT