Railway police seize a 35 cm knife from a passenger during checking at Borivali railway station in Mumbai. saam tv
मुंबई/पुणे

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Passenger Caught With 35 Cm Knife At Borivali Railway Station Mumbai: बोरिवली रेल्वे स्थानकावर तपासणीदरम्यान एका प्रवाशाकडून 35 सेंटीमीटर लांबीचा चाकू जप्त करण्यात आला. मुंबई लोकलमधील अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी तपासणी मोहीम कडक केली आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये नुकत्याच घडलेल्या दोन हत्याकांडांनंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकांवर आणि पादचारी पुलांवर तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. अशातच बोरिवली रेल्वे स्थानकावर तपासणीदरम्यान एका प्रवाशाकडे तब्बल 35 सेंटीमीटर लांबीचा चाकू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास बोरिवली लोहमार्ग पोलिसांचे पथक बोरिवली रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक पुलावर प्रवाशांची तपासणी करत होते. यावेळी मच्छिन्द्रनाथ शंकर पाटील (वय 35, रा. कांदिवली पूर्व) याची झडती घेतली असता त्याच्याकडे अंदाजे 35 सेंटीमीटर लांबीचा धार नसलेला चाकू आढळून आला. पोलिसांनी तत्काळ तो जप्त केला. प्राथमिक चौकशीत संबंधिताने हा चाकू राजस्थानमधून खरेदी केल्याची माहिती दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधिताला नोटीस बजावून सोडण्यात आले.

लोकल ट्रेनमधील अलीकडील गंभीर घटनांनंतरही काही प्रवासी शस्त्रे घेऊन प्रवास करत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी स्थानकांवरील तपासणी आणखी कडक केली असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम राबविण्यात आली. प्रवाशांनी असे घातक आणि धोकादायक शस्त्र सोबत बाळगून आहे आवाहन देखील लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले. सुतार गवंडी आणि इलेक्ट्रिशन यांनी देखील आपली धारदार शस्त्र व्यवस्थित बंदिस्त करूनच प्रवास करावा असे आवाहन बोरवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT