

मालाड परिसरातील खोत डोंगरी या हायप्रोफाईल पुनर्विकास प्रकल्पाच्या जमिनीवरून सुरू असलेला वाद आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचलाय. स्टेटस को असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही हे आदेश डावलून 'क्लासिक ट्रेझर प्रायव्हेट लिमिटेड'च्या साईट ऑफिसवर झोपडी रिक्त करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे ही कार्यवाही करताना क्लासिक ट्रेझर्सला या संबंधी कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. कंपनीचे संचालकांनी यासंबंधी पाठपुरावा केल्यानंतर एसआरए अधिकाऱ्यांनी तो मी नव्हेच ही भूमिका घेतली. पोलीस प्रशासन सुद्धा ऑफिस कंटेनर चालविणाऱ्याविरोधात कारवाई करण्यास हतबल का आहेत, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
क्लासिक ट्रेझरचे संचालक नीलेश राघाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ जून २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एसआरए अंतर्गत सुरू असलेल्या खोत डोंगरी सोसायटी येथील घरे खाली न करणाऱ्याविरोधात कारवाई सुरू होती. त्या कारवाईत 4 घरे निष्कासित करण्याचे एसआरएचे आदेश होते. दरम्यान संबंधित साईटवर काही गुंड प्रवृत्तीची 30 ते 35 लोकांनी बळजबरीने कंटेनर ऑफिस काढण्यास संबंधित यंत्रणेला परावृत्त केलं. जेसीबीच्या सहाय्याने हे कंटेनर ऑफिस रस्त्याच्या कडेला उचलून टाकण्यात आलंय.
याबाबत निलेश राघाणी यांनी दिंडोशी पोलिस यांच्याकडे तक्रार देत पाठपुरावा केला असता पोलिसांनी सदर कंटेनर एसआरए विभागाने हलविला असल्याचे लेखी उत्तर दिले. दरम्यान एसआरएकडे याबाबत पाठपुरावा केला असता त्यांनी यावर मौन बाळगले. तो मी नव्हेच ही भूमिका घेतली. या कार्यवाहीबाबत दिंडोशी पोलिस आणि एसआरए बाबत अनेक संशय निर्माण होतोय.
निलेश राघाणी यांनी हा सर्व प्रकार मुंबईतील महाठग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाह हाऊसकॉन यांच्या सांगण्यावरून गुंडांमार्फत झाला असल्याची तक्रार दिंडोशी पोलीस ठाण्यात केली. यासह डीसीपी झोन 12 यांच्याकडे तक्रार केली संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणात चौकशी करण्याऐवजी न्यायालयात जाऊन न्याय मागण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या एकूणच प्रकरणात एसआरए आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होतेय.
मनसुख शाह आणि संजय शाह यांच्या सांगण्यावरून युसूफ वली मोहम्मद साजिदा हा ३५ हून अधिक अज्ञात गुंडांची टोळी घेऊन प्रकल्पाच्या जागेवर अवैधपणे घुसला. या गुंडांनी क्लासिक ट्रेझरच्या सुरक्षारक्षकांना आणि प्रतिनिधींना बेदम मारहाण केली. सुरक्षारक्षकांनी तात्काळ १०० नंबरवर फोन करून पोलिसांकडे मदत मागितली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांनी गुंडांवर कोणतीही कारवाई केली नाही. तसेच, दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांना लवादाच्या आदेशाची प्रत देऊनही पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला नाही.
बिल्डर निलेश वाघाणी काय म्हणाले?
न्यायालयाने आणि लवादाने आम्हाला 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, शाह हाऊसकॉनने पोलीस प्रशासन आणि एसआरए प्राधिकरणाची दिशाभूल केली. स्थानिक दिंडोशी पोलिसांना हाताशी धरून, ३५ हून अधिक भाडोत्री गुंडांकरवी आमचे साईट ऑफिस बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. आम्हाला न्याय मिळावा आणि या सर्व दोषी संचालकांवर आणि गुंडांवर तात्काळ कठोर कलमांखाली गुन्हा दाखल व्हावा, हीच मागणी आहे. आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत दाद मागितली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.