Former MP Gopal Shetty demands strict action against BMC officials after 15-year-old boy drowns in Borivali's Rani Jhansi lake saam tv
मुंबई/पुणे

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

Boy Drowns in Jhansi Rani Lake: पंधरा वर्षीय अल्ताफ शेखचा मुंबईतील राणी झाशी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बीएमसीला सुरक्षा उपाययोजनांच्या अभावासाठी जबाबदार धरले आहे.

Bharat Jadhav

  • बोरीवलीतील झाशीची राणी तलावात १५ वर्षीय मुलगा बुडून मृत्युमुखी पडला.

  • या तलावावर कोणतीही सुरक्षा यंत्रणा, चेतावणी फलक नव्हता.

  • माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिकेवर गंभीर आरोप केले.

  • जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईच्या बोरीवली पश्चिम येथील झाशीची राणी तलावात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय अल्ताफ मोहम्मद शेख याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हा तलाव बीएमसीच्या देखरेखीखाली असूनही तिथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. शिवाय पालिकेकडून त्या ठिकाणी ना रक्षक, ना चेतावणी फलक! अशी कुठलीही सूचना फलक नसल्यामुळे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी या सर्वाला पालिका जबाबदार असल्याचे म्हणत पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा तात्काळ नोंदवण्याची मागणी केलीय.

अल्ताफ आपल्या तीन मित्रांसह बोरिवली पश्चिमेकडील झाशीची राणी लक्ष्मीबाई तलावात होण्यासाठी केला होता. पोहत असताना त्याने तलावातील मासेही पकडायला सुरुवात केली.तेवढ्यात तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. मात्र बराच वेळ झाला तरी तो वर आला नाही म्हणून मित्रांनी आरडा ओरड सुरू केली. जवळील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला बोलावले.अग्निशमन दलाने पाण्यात उतरून अल्ताफचा मृतदेह बाहेर काढला.

घटनेनंतर भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बीएमसीवर गंभीर आरोप करत, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांवर तात्काळ एफआयआरची मागणी केली आहे. तसेच, एमएचबी पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन सुरू केलं आहे. ही केवळ दुर्घटना नाही, तर बीएमसीच्या निष्काळजीपणामुळे घडलेला मृत्यू असल्याचं शेट्टी यांनी म्हटले आहे.

बोईसरमध्ये खड्ड्यातील पाण्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू

बोईसरमध्ये खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चारपैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बोईसरमधील गणेशनगर परिसरात ही घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

SCROLL FOR NEXT