Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Mumbai Potholes : मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे सर्वसामान्यांच्या जीवावर उठलेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी खड्डेमुक्त रस्त्याबद्दल दिलेल्या आश्वासनचं काय झालं? रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी किती खर्च करण्यात आलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Mumbai Potholes News
Mumbai Potholes Saam tv
Published On

अवघ्या 18 वर्षाचा यश मोरे...भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. खड्डयात पडून मृत्यू झाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं.. यशच्या अकाली मृत्यूसाठी कुटुबियांनी प्रशासनालाच जबाबदार धरलयं.

केवळ गेल्या महिन्याभरात मुंबईतील रस्त्यांनी चारजणांचा जीव घेतलाय.

16 जून 2025

BKC मेट्रो स्टेशनजवळ 13 वर्षीय मुलाचा खड्ड्यामुळे मृत्यू

19 जून 2025

मुंबई- नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

20 जुलै 2025

भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्याने घेतला युवकाचा बळी

26 जुलै 2025

पवईतील रस्त्यावरील खड्ड्यानं दुचाकी स्वराचा जीव घेतला

Mumbai Potholes News
Malegaon Blast Case : RSS नेत्याच्या हत्येचा आरोप, मालेगाव प्रकरणात निर्दोष; प्रज्ञा सिंह ठाकूर कोण आहेत?

मुंबईतील रस्त्यांबाबत पालिकेचे अधिकारी असोत की सत्ताधारी सगळ्यांनी वेगवेगळे दावे केलेत मात्र प्रत्यक्षात हे सगळेच दावे खोटे ठरलेत .2024 च्या आकडेवारीनुसार खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबईत तब्बल 273 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत.

तरीही मुंबईतील रस्त्यांची चाळण झाल्याचं पाहायला मिळतयं. त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती आणि महापालिकेवरती टीकेची झोड उठवलीय.

Mumbai Potholes News
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; मान धरली अन् पाठीत बुक्क्यांचा मार, VIDEO व्हायरल

आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मुंबईतील विकास कामांबद्दल वेगवेगळे दावे केले जातील. सत्ताधारी आणि विरोधक मुंबईकरांसाठी नेमकं कोणी काय केलं, याची यादी मांडतील. मात्र खरी वस्तुस्थिती पाहता मुंबईकरांना रस्त्यावरच्या खड्ड्यांना दिवसरात्र समोरे जाव लागतयं. त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांची समस्या कधी संपणार? असा सवाल विचारला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com