Mumbai High Court Saam Tv
मुंबई/पुणे

म्हातारपणात मुलांनी सांभाळलं नाही, तर आई-वडील आपली मालमत्ता परत घेऊ शकतात: मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले आहे की, मुलांनी वृद्ध आई-वडिलांची काळजी घेतली नाही तर त्यांनी भेटपत्राद्वारे दिलेली मालमत्ता परत मिळवू शकतात

Namdeo Kumbhar

Bombay High Court Rules Parents : मुलांनी जर आपल्या म्हातारपणात काळजी घेतली नाही, तर आई-वडिलांना त्यांना दिलेली मालमत्ता किंवा घर परत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी बनवलेल्या कायद्यानुसार कोर्टाने हा निर्णय दिला. पालकांना म्हातारपणात वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.

आर्थिक परिस्थितीचा संबंध नाही

कोर्टाने स्पष्ट केले की, हा नियम सर्व पालकांसाठी लागू असेल. आई-वडील स्वतःच्या पायावर उभे असतील, श्रीमंत असतील किंवा त्यांची स्वतःची कमाई असेल, तरीही मुले त्यांच्याशी वाईट वागत असतील तर ते आपले दिलेले घर किंवा जमीन परत घेऊ शकतात. पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि या हक्काचा काहीही संबंध नाही.

नेमकी घटना काय होती?

लोअर परेलमधील एका ४२ वर्षांच्या मुलाने याचिका दाखल केली होती. त्याच्या ६८ वर्षीय वडिलांनी (जे व्यावसायिक आहेत) आपले एक घर २०२३ मध्ये मुलाला 'गिफ्ट डीड' (भेटपत्र) करून दिले होते. अट अशी होती की मुलाने आई-वडिलांची म्हातारपणात काळजी घ्यावी. पण पुढे जाऊन मुलाने आणि त्याच्या कुटुंबाने वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. परिस्थिती इतकी बिघडली की वृद्ध आई-वडिलांना स्वतःचेच घर सोडून जावे लागले.

त्यानंतर वडिलांनी 'वरिष्ठ नागरिक कायद्या'अंतर्गत न्यायाधिकरणाकडे (ट्रिब्यूनल) धाव घेतली होती. ट्रिब्यूनलने मुलाला घर रिकामे करून ते वडिलांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला. या आदेशाविरोधात मुलाने हायकोर्टात अपील केले होते. मुलाचे म्हणणे होते की, "माझे वडील श्रीमंत आहेत, त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यामुळे त्यांना पैशांची किंवा घराची गरज नाही." पण हायकोर्टाने मुलाचा हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला आणि वडिलांच्या बाजूने निकाल दिला.

कायदा नेमका आहे तरी काय ?

वरिष्ठ नागरिक संरक्षण कायदा, २००७ च्या कलम २३ नुसार (Section 23 of Senior Citizens Act), जर मुलांनी वृद्ध पालकांना मूलभूत गरजा आणि अन्न-पाणी-औषध देण्याची अट पाळली नाही, तर पालकांनी मुलांना दिलेले मालमत्तेचे हक्क रद्द (Void) मानले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत बोगस बियाण्याचा सुळसुळाट

ग्लोईंग स्किनसाठी फेस सीरम आहे बेस्ट; जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

IAS Transfers : प्रशासनात मोठा बदल! ८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुठे कोणाची होणार नियुक्ती? वाचा

Rajesh Sharma: शूटिंगदरम्यान चावला विषारी किडा; प्रसिद्ध अभिनेता राजेश शर्मांची प्रकृती गंभीर, AICWA ने केली चौकशीची मागणी

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, इंजिनिअर्सच्या मागण्या पूर्ण होणार? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT