मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला आज अज्ञात ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या टॉवर बिल्डिंगमध्ये ४ आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि दुपारी ३ वाजता त्यांचा स्फोट होईल", अशी धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितल्यानुसार हा ईमेल 'कॉम्रेड पिनारायी विजयन' नावाच्या ईमेल-आयडीवरून आला होता.
धमकी मिळताच, बीएसई अधिकाऱ्यांनी पोलिसांना सतर्क केले. त्यानंतर बॉम्बशोधक पथके आणि स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि परिसराची कसून तपासणी केली. मुंबई पोलिसांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएसच्या कलम ३५१(१)(ब), ३५३(२), ३५१(३), ३५१(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे, अमृतसरमधील प्रतिष्ठित सुवर्ण मंदिराला सोमवारी, १४ जुलै रोजी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) पोलिस तक्रार दाखल केली. सोमवारी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील किमान तीन शाळांना सकाळी बॉम्बच्या धमक्या मिळाल्या, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिली होती. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी ८ वाजता प्रशांत विहार आणि द्वारका सेक्टर १६ मधील सीआरपीएफ शाळा तसेच चाणक्यपुरीमधील आणखी एका शाळेतून बॉम्बस्फोटाच्या धमक्यांबाबत दिल्ली पोलिसांना फोन आले होते, ज्यामुळे दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.