“Panic at Mumbai High Court after bomb threat; police and bomb squad on high alert.” Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! मुंबई High Court बॉम्बने उडवण्याची धमकी, परिसरात एकच खळबळ

High Court bomb threat : मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ईमेलद्वारे धमकी देण्यात आली. न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले.

Namdeo Kumbhar

  • मुंबई हायकोर्टाला बॉम्ब धमकी ईमेलद्वारे मिळाली.

  • धमकीनंतर न्यायाधीश, वकील व नागरिकांना बाहेर काढण्यात आलं.

  • बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी परिसराची तपासणी केली.

  • आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.

Mumbai High Court bomb threat latest news : राजधानी दिल्लीतील हायकोर्टानंतर मुंबईतील हायकोर्टही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा ईमेल मिळताच हायकोर्टात पोलीस दाखल झाले आहेत. बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी कऱण्यात येत आहे. धमकी मिळाल्यानंतर तात्काळ मुंबईतील हायकोर्टात असणाऱ्या सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि इतर लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळताच कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू असून परिसर रिकामा करण्यात आला आहे. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

बॉम्बे हायकोर्टाला धमकी मिळाल्यानंतर पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. बार अॅण्ड बेंचच्या रिपोर्ट्सनुसार, बॉम्बेची धमकी मिळताच गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याशिवाय पोलिसांकडून हायकोर्ट परिसर खाली करण्यात आला आहे. बॉम्बने उडवून देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. परिसरात बॉम्ब शोधक पथकाकडून तपास करण्यात येत आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

दिल्ली हायकोर्ट उडवण्याचीही धमकी

राजधानी दिल्लीमधील हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल दिल्ली पोलिसांना मिळाला होता. हायकोर्टामध्ये तीन बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेल आला होता. त्यानंतर तात्काळ हायकोर्ट खाली करण्यात आले होते. पोलिसांकडून तात्काळ उपाययोजना करत तापस सुरू करण्यात आला. हायकोर्टमधील न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात आलेय. दिल्ली पोलिसांकडून याबाबतचा तपास सुरू करण्यात येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या माजी नगरसेवकानं नाशिकमध्ये खून केला; ठाकरे सेनेच्या खासदाराचा गंभीर आरोप

Janjira Fort History: समुद्राच्या लाटांमध्ये उभा जंजिरा किल्ला; वास्तुकला, रंजक इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने बक्षीस वितरण समारंभ

बेफाम पर्यटकांचा प्रताप समोर, भरधाव वेगात समुद्रकिनारी धावणारी थार गाडी अचानक उलटली अन्...; पाहा व्हिडिओ

35 गुण मिळवणारा मेरिटमध्ये येत नाही, त्यालाही अभ्यास करावा लागतो; सुधीर मुनगंटीवारांनी कुणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT